शिवसेनेच्या दसरा मेळावा याचिकेवर उद्या सुनावणी

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

दादर परिसरातील (Dadar Area) छत्रपती शिवाजी पार्क (Chhatrapati Shivaji Park) अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्यास मुंबई (Mumbai) पालिकेने परवानगी नाकारल्याने शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली.

तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी शिवसेनेच्या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता शिवाजी पार्कबाबत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या १२ वाजता सुनावणी होणार आहे.

तसेच आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत (Petition) दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकरिता आपला अर्ज पालिकेकडे गेल्याचा त्यांचा दावा आहे. तर खरी शिवसेना (Shivsena) ठाकरे गट असल्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे असे ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे.

यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही, BMC ने परवानगी नाकारली

दरम्यान, शिंदे गट (shinde Group) आणि ठाकरे गटांने शिवाजी पार्कवर मेळाव्याबाबत बीएमसीकडे (BMC) परवानगी मागितली होती. पंरतु निर्णय द्यायला महापालिकेने उशीर केल्यानंतर ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. बीएमसीने नुकतेच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *