Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारबोरद येथे होतेय बगळ्यांची शिकार

बोरद येथे होतेय बगळ्यांची शिकार

बोरद Borad । वार्ताहर

बोरद येथील वनविभागाच्या कार्यालयाबाहेर (Forest Department office) असलेल्या झाडांवर सध्या टारगट मुलांकडून (target children) बगळयांची शिकार (Heron hunting) मोठया प्रमाणावर केली जात आहे. याकडे वनविभागाने लक्ष देवून संबंधीतांवर कारवाई (Action) करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

बोरद ता.तळोदा येथे वनविभागाचे स्थायी कार्यालय आहे. या कार्यालयाला चारही बाजूंनी अनेक जातींच्या मोठमोठ्या वृक्षांनी वेढले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वृक्ष हे गुलमोहोराचे आहेत. नुकतीच झाडांना नवीन पालवी फुटल्याने झाडांना हिरवा रंग शोभून दिसत आहे. या हिरव्या रंगाचा मोह पक्षांनाही मोहित करत आहे. अशा या झाडांवर पक्ष्यांचे वास्तव्यही मोठ्या प्रमाणाने वाढले आहे.

पक्ष्यांमध्ये सर्वाधिक पांढर्‍या रंगाचे बगळे आहेत. सध्या पावसाचे दिवस असले तरी उन्हाने सर्व बेजार आहेत. त्यात पक्षी कसे सुटतील ते ही उन्हापासून वाचण्यासाठी या झाडांचा आसरा घेत असतात. गावातील काही टवाळकी मुले ही या ठिकाणी येत असतात व झाडांच्या सावलीचा आधार घेत गप्पागोष्टी रंगवत असतात

. अशात गंमत म्हणा किंवा खरोखर शिकार म्हणून ही मुलं झाडावरील पक्ष्यांना दगडाने मारतात. काहीवेळा तर गोफणचा ही उपयोग केला जातो. अशामुळे कळत नकळत या बगळ्यांची शिकार होते.

बागळ्यांची शिकार करण्यासाठी दगडांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे दगड शेजारी असणार्‍या घरांवर तसेच परिसरात असणार्‍या दुकानांच्या छतावर देखील कोसळतात. त्यामुळे पत्र्याचे छत असेल तर त्यामुळे मोठा आवाज होतो. बर्‍याच वेळा या मुलांना हटकण्याचा ही प्रयत्न केला जातो. परंतू ही मुले ऐकून घेत नाहीत. त्यामुळे रोज 4 ते 5 बगळ्यांची शिकार होत असते.

परिसरातील नागरिकही या गोष्टीला वैतागले आहेत. एक तर बर्‍याच वेळा वनविभागाचे कार्यालय बंद असते कारण वनरक्षकांना जंगलातही जावे लागते. त्यामुळे अशा मुलांचे फावते. या बाबीकडे पक्षीप्रेमींनी गांभीर्याने देण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या