Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशतब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त

तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त

गुजरातमध्ये (Gujrat) भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने (ATS) संयुक्त कारवाईत तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे. या प्रकरणी ६ जणांसह पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. यापुर्वी एप्रिल महिन्यांत १५० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले होते.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

- Advertisement -

अल हुसैनी (Al Al Huseini) ही पाकिस्तानी (Pakistan) नाव पथकाने ताब्यात घेतली. अधिकाऱ्यांना गस्त घालत असताना गुजरात किनारपट्टीजवळ एक पाकिस्तानी नाव दिसली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७७ किलो हेरॉइन (Heroin) जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत ४०० कोटी रुपये इतकी असून सध्या अधिक तपास सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या