Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्ह्यात हर्ड इम्युनिटी चे प्रमाण कमी

जिल्ह्यात हर्ड इम्युनिटी चे प्रमाण कमी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात कोरोनाने कहर केला होता, तर सप्टेंबर महिना आतापर्यंतचा सर्वाधिक घातक महिना ठरला आहे.

मध्यंतरी कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार पहावयास मिळाला होता. जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली असून ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोना बाधींतांच्या संख्यत घट झाली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 92.55टक्क्यांपर्यत पोचला असून मृत्यूदराच्या प्रमाणात देखिल मोठया प्रमाणात घट होवून 2.40 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मृत्यूदराचे प्रमाण कमी होणे हि दिलासादायक बाब असली तरी आगामी सण, उत्सव काळात बाजारपेठांमध्ये होणारी संभाव्य गर्दी आणि वातावरणातील बदलांमुळे नागरिकांनी आपल्या तसेच कुटूंबाच्या आरोग्याची काळजी काटेकोरपणे घ्यावी. आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावे. तसेच प्रवास देखील आवश्यक असेल तरच करावा. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हावासियांनी मास्कचा वापर करणे, सोशल फिजीकल डिस्टन्सिंगसह आवश्यक नियमांचे पालन करून खबरदारी घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील 400 नागरीकांच्या रक्ताचे नमुने ’सेरो‘चाचणीसाठी घेण्यात आले होतेे. या सर्वेक्षण अहवालानुसार, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींचे प्रमाण 25 टक्क्यांच्या जवळपास आढळून आले आहे.

त्यामुळे नागरींकांमधे ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झालेली नसल्याने जिल्हावासियांनी यासंदर्भात विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.

मृत्युदराचे प्रमाण नियंत्रणात

गेल्या सहा महिन्यांत जिल्हयात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णवाढीचा दर जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात होता. मृत्यूचे प्रमाण देखिल बरेच होते.

परंतु आरोग्य अणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे मृत्युदरांचे प्रमाण नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आतापर्यंत 51हजार 213 रूग्णसंख्या झाली असून 47हजार 396 रूग्ण उपचारांअंती बरे झाले आहेत. तर 1230 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत 717 लक्षणे असलेले तर 1870 लक्षणे नसलेले असे एकूण 2587 रूग्णांवर उपचार केले जात आहेत. आरटीपीसीआर 99हजार 708 आणि 1लाख, 25हजार, 787 असे 2लाख, 25हजार, 495 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

त्यापैकी 1लाख, 72हजार, 992 अहवाल निगेटिव्ह तर 51हजार, 213 अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाले असून 167 अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या