Thursday, April 25, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-३

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-३

डॉ. प्रशांत पुरंदरे-स्रीरोग व प्रसुती शास्रतज्ञ, नाशिक

आयुष्याच्या एका  विशिष्ट संक्रमणाच्या कालावधीला टप्प्याला किशोरवय म्हणतात व त्यातील लैंगिक विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.

- Advertisement -

यावेळी शरीरात आकर्षक बदल होणे, लैंगिक जाणीवा विकसित होणे, भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटणे, समलिंगी व्यक्तीबद्दल इर्षा वाटणे अशीही प्रगती होत असते.

किशोरवय हा संक्रमणाचा कालखंड साधारणपणे पौगंडावस्थेपासून सुरू होतो व माणसाचे पूर्ण विकसित प्रौढ व्यक्तीत रूपांतर झाल्यावर संपतो. त्यामधे माणसाच्या शारीरिक, लैंगिक, मानसिकचा व सामाजिक वाढ व विकासाचा समावेश होतो. या प्रक्रिया थोड्या पुढे-मागे सुरू होत असल्याने व कमी-अधिक काळापर्यंत सुरू राहात असल्याने किशोरावस्थेची निश्चित व्याख्या करणे व कालमर्यादा ठरवणे अवघड आहे (व त्यामधे तज्ञांत मतभेद आहेत). सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून  ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते.

किशोरवयातील आकर्षणाचे

१) शारीरिक

२) मानसिक

३) बौद्धिक  

४) सामाजिक 

असे वर्गीकरण करता येईल.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग – २

शारीरिक आकर्षण

आकर्षण निर्माण करणारे घटक. विविध संशोधनांनुसार, आकर्षण निर्माण करणारे दोन घटक आहेत: 

1) परिस्थितीजन्य घटक जसे की समीपता, परिचितता आणि चिंता; आणि

2) वैयक्तिक घटक जसे की समानता, वैयक्तिक गुण, आवडीची परस्परता आणि शारीरिक आकर्षण. 

परिस्थितीजन्य घटक

————— ———-   

अ) समीपता– याचा अर्थ असा की किशोरवयीन सहसा दूर राहणाऱ्यांपेक्षा त्यांच्या जवळ राहणारे मित्र किंवा प्रियकर म्हणून निवडतात.

ब) परिचितता– या घटकाच्या अनुषंगाने व्यक्तीच्या वारंवार संपर्कात आल्यामुळे आपल्याला इतरांबद्दल आकर्षण निर्माण होते.

क) चिंता किंवा तणाव – जास्त चिंता किंवा तणाव असलेले लोक एकटे राहणे पसंत करतात, तर ज्या लोकांमध्ये चिंता आणि तणाव कमी असतो ते इतरांसोबत राहणे पसंत करतात. अशाप्रकारे परिस्थितीजन्य घटक हे दर्शवतात की, किशोरवयीन मुलांचे इतर लोकांबद्दलचे आकर्षण त्यांच्या इतरांशी जवळीक, त्यांच्या ओळखीमुळे उद्भवते.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१

वैयक्तिक घटक:

अ) समानता –  जे लोक त्यांच्या वृत्ती आणि वैशिष्ट्यांमध्ये आपल्यासारखेच आहेत त्यांच्याकडे आपण अधिक आकर्षित होतो. हे घडते कारण ते आपल्याला जगाबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्यास मदत करते आणि हे गृहीत धरण्यास मदत करते की आपण ज्यांना पसंत करतो ते आपल्याला आवडतील; 

ब) वैयक्तिक गुण – नकारात्मक तसेच सकारात्मक दोन्ही गुण असलेले लोक आवडतात आणि जे निर्दोष आहेत ते जास्त आकर्षित होतात.

क) आवडीचा परस्परसंवाद – हा विश्वास आहे की जे लोक आपल्याला आवडतात किंवा जे आपले मित्र आहेत त्यांच्याकडे आपण आकर्षित होतो. 

ड) शारीरिक आकर्षण – किशोरवयीन मुले ज्यांना कमी आकर्षक वाटतात त्यांच्यापेक्षा ते ज्यांना शारीरिकदृष्ट्या अधिक आकर्षक दिसले त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसतात. अशा प्रकारे आकर्षणाचे वैयक्तिक घटक हे दर्शवतात की किशोरवयीन मुलांचे इतर लोकांबद्दलचे आकर्षण त्यांच्या वैयक्तिक गुणांमुळे, वृत्तीची समानता, आवडीची परस्परसंबंध आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या अधिक आकर्षक वाटतात यामुळे उद्भवते. शिवाय आकर्षणामध्ये लिंग भिन्नतेचे पुरावे आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

४ प्रकारचे लैंगिणक आकर्षणे दिसतात

१) विषमलिंगी – hetersexual जे नैसर्गिक आहे

२) समलिंगी – homosexual

3) उभयलिंगी – bisexual दोन्ही लिंगी

४) अलैंगिक – asexual ह्यात रसच नसणे

मानसिक आकर्षणे

या वयातील कल्पना, संकल्पना, विचार व भावना मुलांच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात.

या वयातील मुले स्वतःला व भोवतालच्या जगाला समजून घेण्याचा, ताडून बघण्याचा व मर्यादा समजून घेण्याचा आणि जगामधे आपले स्थान ओळखण्याचा व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.  मुलांमधे स्वत्वाची जाणीव निर्माण होऊ लागते व ती आत्मसन्मान राखण्याचा प्रयत्न करतात. ती स्वतःला व इतरांना ओळखण्याचा प्रयत्न करू लागतात. उत्स्फूर्त वर्तणुकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न, जबाबदारी जाणण्याचा व पेलण्याचा प्रयत्न, मोठे होण्याची इच्छा, भविष्याचे नियोजन, निर्णयक्षमतेची वाढ हे या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळे त्यांना खालील आकर्षणे दिसतात.

१) उच्च दर्जाचा मोबाईल, उत्तम कपडे, उत्तम मोटरबाईक.

२) नाविन्याची ओढ व नवनिर्मितीच्या इच्छेमुळे ते धाडसी क्रियेकडे आकर्षित होतात उदा; जोरात गाडी चालवणे, डोंगर चढणे, पाण्यात उडी मारणे, मारामारी करणे इत्यादी.

३) त्यांना नवीन गोष्टी करून बघण्याची, नवीन अनुभव घेण्याची व शोध घेण्याची तीव्र इच्छा असते त्यामुळे धुम्रपान, दारू, नशेचे पदार्थ, जुगार इथे ते आकर्षित होतात.

४) त्यांना सतत प्रश्न पडतात व त्यांची उत्तरे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो व ते गूगल,पोर्नोग्राफी, ऑनलाइन चाटकडे आकर्षित होतात.

५) आदर्शवाद, निरनिराळ्या आदर्शवादी विचारसरणी, भव्य गोष्टी यांचेही आकर्षण असते. आदर्श-व्यक्ति आणि त्याचबरोबर बंधने झुगारणाऱ्या, बंडखोर, वेगळ्या वाटेने चालणाऱ्या व्यक्तींबद्दलही (क्रांतिकारी व गुन्हेगारी वृत्तीच्या अशा दोन्ही) त्यांना आकर्षण वाटते.

बौद्धिक आकर्षणे

या वयातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकता, विचारांची पद्धत व वागण्याची पद्धत हे या वयातील बौद्धिक आकर्षणाचे परिणाम म्हणता येतील उदा : एखादा शोध,लेख लिहिणे, निबंध लिहिणे, कविता करणे, चित्रकला, खेळ, वाद्य इत्यादी.

वैचारिक आकर्षणे 

या वयात मुले योग्य व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना चांगले वैचारिक आकर्षणे दिसतात. अन्यथा त्यांच्यातील वैचारिक गोंधळ वाढतो व भावनिक दृष्ट्या ती अस्थिर व कमकुवत राहू शकतात व विकृती कडे आकर्षीत होता.

सामाजिक आकर्षणे

स्वतःची ओळख 

या वयातील मुले मुख्यतः स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. याची सुरुवात स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करण्यापासून होते. मुले स्वतःची ओळख बाह्य गोष्टींतून (कपडे, केसांचे वळण, आवडी-निवडी, फॅशन, इ.) व व्यक्तिमत्त्व विकासातून निर्माण करण्याचा ती प्रयत्न करतात. मुली आकर्षक दिसण्याचा व लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. इतरांना आधार किंवा मदत देतात व उपयोगी पडतात. मुले स्वतःला सिद्ध करण्याचा व इतरांवर (विशेषतः मुलींवर) प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. आपल्या बरोबरच्या मुला-मुलींत उठून दिसण्यासाठी व आपले वेगळेपण दाखवण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते.

सर्व चांगले वाईट आकर्षणाचा अतिरेक होऊ नये म्हणून पालकांनी खालील प्रयत्न करावे.

१) संवाद: सर्वात महत्वाचे सतत त्यांची संवाद साधावे.

२) जागरूकता ठेवा: ते काय करतात,कुठल्या संगतीत आहेत,अभ्यास वैगेरे ह्या बद्दल जागरूक रहा.

३) स्पष्ट नियम आखा: त्यांनी काय करावे आणि काय करू नये असे नियम करा व ते आमलात आणा.

४) आदर करा: त्यांच्या शी आदराने वागा लहान म्हणून वारंवार दुखवू नका.

५) भावनिक जोड: त्यांच्याशी इमोशनिली कनेक्ट व्हा.

- Advertisment -

ताज्या बातम्या