Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय मंत्री डॉ. पवार, खा. हेमंत गोडसे करोना पॉझिटिव्ह

केंद्रीय मंत्री डॉ. पवार, खा. हेमंत गोडसे करोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशभरात गेल्या काही दिवसांपासून करोना (Corona) रुग्णसंख्या वाढत चालली आहे. राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते तसेच १२ हून अधिक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar), खा. हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना करोनाची बाधा झाली आहे…

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि खा. हेमंत गोडसे यांनी आपापल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. खा. गोडसे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. गेल्या वर्षीदेखील त्यांना करोनाची बाधा झाली होती.

डॉ. भारती पवार यांनी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या गृहविलगीकरणात आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांना मी करोना चाचणी करून घेण्याचे आणि करोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करते, असे ट्वीट त्यांनी केले होते. परंतु हे ट्वीट आता डिलीट करण्यात आले आहे.

खा. गोडसे यांनी म्हंटले आहे की, आज कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सतर्क रहावे. व लक्षणे आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करुन घ्यावी, ही नम्र विनंती. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईल. सर्वांनी काळजी घ्या, शासनाच्या नियमांचे पालन करा!, असे त्यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या