साज वाटप करीत बळीराजाला संकटकाळात मदतीचा हात

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यावर Farmer अनेक वर्षापासून आर्थिक, अस्मानी संकट Crisis निर्माण होत आहे. यातच दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट crisis of the corona निर्माण झाले असल्याने बळीराजा Baliraja देखील संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी Social commitment जोपासत सुमीरा गांधी परिवार Sumira Gandhi family आणि नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे Nehru Chowk Multipurpose Friends Circle 31 शेतकर्‍यांना पोळ्याचा साज वाटप करीत मदतीचा हात Helping hand दिला आहे.

गेल्या 7 वर्षांपासून नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्यातर्फे हा उपक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, चोपडा मतदारसंघाच्या आ. लताताई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, उद्योजक संजय गांधी, नेहरू चौक मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्यासह शेतकरी रवींद्र गणपत पाटील हे उपस्थित होते. सुरुवातीला आ. सुरेश भोळे यांनी, आमची शेती, आमची माती, पिकवू येथे माणिक मोती या जिद्दीने आज भारतीय शेतकरी प्रगती करत आहे. शेतकर्‍यांप्रती सामाजिक बांधिलकी महत्वाची असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले. आ. लताताई यांनी, बळीराजा देशाचा पोशिंदा असून त्याला वंदन करून आपण मदत केली पाहिजे असे सांगितले. त्यानंतर जि. प. सदस्य प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन व आभार प्रकाश आडते यांनी मानले. यावेळी रिकेश गांधी, पियुष गांधी यांच्यासह पंकज पाटील, रोहित शिरसाठ, दर्शन बारी, वैभव जगदाळे, धनंजय अमोदकर, प्रसाद विसपुते, शेखर सोनवणे, ऋषभ गांधी, चेतन माळी उपस्थित होते.

या शेतकर्‍यांना वाटले साज

जिल्ह्यातील 31 शेतकर्‍यांना साज वाटप करण्यात आला. यामध्ये दीपक वानखेडे,पांडुरंग नारखेडे, बळीराम अत्तरदे, पिंटू काटे, भूषण धनगर, राकेश बारेला, विलास पाटील, समाधान पाटील, राजू पाटील, नाना पाटील, राहुल सावळे, नरेंद्र सावळे, प्रदीप चौधरी, भारत कांचाने, नितीन चौधरी, बळीराम बारेला, उमेश पाटील, रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर हरणकर, भगवान शिंदे, समाधान पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र पाटील, महेंद्र शिरसाठ, बबलू बारी आदींचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *