Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रग्रामीण कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत

ग्रामीण कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत

मुंबई । प्रतिनिधी

कर्तव्य बजावताना करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील आणखी चार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफ यांनी दिली.

आतापर्यंत कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

प्राप्त प्रस्तावांपैकी आज रघुनाथ वाटेगांवकर, ग्रामसेवक (खरातवाडी, जि. सांगली), अशोक भोसले, ग्रामविकास अधिकारी (वाठार तर्फ वडगाव, जि. कोल्हापूर), मजिद शेख, ग्रामपंचायत कर्मचारी (डिगडोह देवी, जि. नागपूर), अंबादास ठाणगे, कनिष्ठ सहायक लिपीक (अहमदनगर जिल्हा परिषद) या मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये विमा कवच मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या