Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनिमानी परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी; प्रवाशांचे रस्ता ओलांडणेही झाले अवघड

निमानी परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी; प्रवाशांचे रस्ता ओलांडणेही झाले अवघड

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati | Nashik

पंचवटीतील (Panchavati) निमानी बस स्टॅन्ड (Nimani Bus Stand) समोर सायंकाळी तीन नंतर रात्री उशिरापर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी होत असल्याने शहर बस वाहतुकीतून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना स्टैंड वर जाणे व स्टॅन्ड वरून बाहेर पडणे अवघड झाले आहे.

- Advertisement -

सकाळी शहर पोलीस (city police) वाहतूक शाखेचे अनेक अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतात परंतु सायंकाळी तीन नंतर रात्री उशिरापर्यंत शहर वाहतूक पोलीस अधिकारी (Traffic Police Officer) व कर्मचारी यांच्या बऱ्याचवेली अनुपस्थितीमुळे या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी होते. दिंडोरी रोड (dindori raod) वरून व पेठ रोड (peth road) वरून शहराकडे आणि आडगाव नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांची तोबा गर्दी असते.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, शाळकरी मुलांना (students) व महाविद्यालयीन युवक युवतींना रस्ता ओलांडणे म्हणजे जीव मुठीत धरून चालणे अशी परिस्थिती या ठिकाणी असते.

भडक दरवाजासमोरील रिक्षा स्टॅन्ड (Rickshaw stand) त्याचबरोबर वाहतूक बेटा जवळील रिक्षा स्टॅन्ड निमानी जवळील रिक्षा स्टॅन्ड आणि निमानी बस स्थानकाला (Nimani Bus Station) लागून भाजीपाला (vegetables) व फळे विक्रेत्यांची दुकाने तसेच दिंडोरी कडून येणाऱ्या रस्त्यावर निमानीच्या कॉर्नर वर बसणारे भाजीपाला विक्रेते त्याचप्रमाणे पेठ रोड करून दिंडोरी रोड कडे जाणाऱ्या कॉर्नर वर बसणारे

भाजीपाला विक्रेते (Vegetable seller) आणि टॅक्सी स्टँड (Taxi stand)समोरील वाहनांची गर्दी यामुळे या ठिकाणी वाहनांची तोबा गर्दी होते. प्रवासी वर्गाला आणि पादचारी वर्गाला कसरत करून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. मालेगाव स्टँड कडून दिंडोरी रोड कडे, पेठ रोड कडे आणि निमानी बस स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना देखील खूप वेळ थांबावे लागते.

महिला वर्गाला दुचाकी वाहन चालवताना तर मोठी कसरत करावी. या ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणे गरजेचे आहे. सायंकाळी प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गात संताप निर्माण होतो पण मधूनच येणाऱ्या आडव्या होणाऱ्या व सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहन चालकांपुढे प्रवासी वर्गाने नतमस्तक होणे पसंत केले .

- Advertisment -

ताज्या बातम्या