अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 75 कोटी 26 लाखांचा पहिला हप्ता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात यंदा जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याचा

निर्णय राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकाने घेतला आहे. त्यानूसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी मदतीचा 2 हजार 297 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मंजूरी देण्यात आली असून नरगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 75 कोटी 26 हजारांची मदत मिळणार आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर, या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत देण्याचा विषय सरकारच्या विचारधीन होता. त्यानूसार ज्या शेतकर्‍यांचे किमान 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकर्‍यांना शेतीपिकांच्या जिरायत व आश्‍वासित सिंचना प्रकारानूसार शासकीय मदत देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकर्‍यांसाठी महाविकास आघाडी सरकारने 2 हजार 297 कोटी 6 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे.

यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 75 कोटी 26 लाख रुपयांची मदत पहिल्या टप्प्यात मिळणार आहे. यासह राज्यात सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकांची आदर्श आचार संहिता ज्या विभागात लागू आहे. त्या विभागात मदतीचे वाटप करताना आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *