Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळ्यात जोरदार पाऊस

धुळ्यात जोरदार पाऊस

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी अर्धातास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते.

- Advertisement -

दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारा नकाणे व डेडरगाव तलाव ओसांडून वाहत आहेत.जिल्ह्यावर यंदा वरूणराजाने कृपादृष्टी केली आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.

तर साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प शंभर टक्के भरले असून सांडण्यावरून पाणी वाहत आहेत.

तसेच धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे नकाणे व डेडरगाव तलाव देखील ओसांडून वाहत आहेत. दरम्यान रविवारी सायंकाळी धुळे शहरासह परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या