ओझे | Oze
दिंडोरी तालुक्यात आज दुपार पासून वळीव स्वरूपच्या पाऊसाला सुरुवात झाली होती…
- Advertisement -
मात्र सांयकाळ पासून विजाच्या गडगडासह अनेक ठिकाणी पाऊसाने हजरी लावली.
रात्री ९ वाजेच्या दरम्यान दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे विजाच्या गडगडासह ढगफुटी सारख पाऊस होऊन येथील अनेक पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नाल्याना पूर येवून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.
त्याचप्रमाणे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पाऊसाने गेल्या दहा वर्षातील रेकॉड मोडल्याची माहिती शिंदवड येथील शेतकरी सचिन बस्ते यांनी दिली आहे