Tuesday, April 23, 2024
Homeनगरअतिवृष्टीने नुकसानग्रस्त घरे व जनावरांना 49 लाखांची मदत - ना. विखे

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त घरे व जनावरांना 49 लाखांची मदत – ना. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अहमदनगर जिल्ह्यात जून ते जुलै 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या कारणामुळे नुकसान झालेल्या घरांना जनावरांच्या गोठ्यांना मदत म्हणून 49 लाख 37 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

मोठ्या स्वरुपात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे, झोपड्यांचे, जनावरांच्या गोठ्याचे तसेच मृत जनावरांचे महसूल विभागाने पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मंत्री विखे पाटील यांनी याबाबतचा पाठपुरावा करुन मदतीचे अनुदान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्राप्त करून दिले आहेत. मंजूर रक्कम नुकसान झालेल्या लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

मंजूर झालेल्या अनुदानात नगर तालुक्यासाठी 60 हजार रुपये, अकोलेसाठी 1 लाख 96 हजार, जामखेडसाठी 2 लाख 16 हजार, कर्जतासाठी 2 लाख 25 हजार, कोपरगावसाठी 2 लाख 22 हजार, नेवासा 96 हजार तर पारनेसाठी 1 लाख 60 हजार, पाथर्डीसाठी 36 हजार, राहुरी 1 लाख 32 तर संगमनेरसाठी 26 लाख 37 हजार रुपये तर श्रीगोंद्यासाठी 3 लाख 81 हजार, श्रीरामपूरसाठी 1 लाख 86 हजार तसेच राहाता तालुक्यासाठी 3 लाख 90 हजार रुपये अशा स्वरुपात अनुदानाची प्राप्त झालेली रक्कम आहे. त्याच प्रयोजनासाठी वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनास दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या