Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअबब! वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांकडून आकारला 'इतका' दंड

अबब! वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांकडून आकारला ‘इतका’ दंड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात बेदरकारपणे वाहने चालवत तसेच नियमांचे उल्लंघन करत नो पार्किंगमध्ये (No parking) वाहने पार्क केल्याचा गंभीर प्रश्न उद्भवत आहे. वाहतूक पोलीस (Traffic police) वेळोवेळी कारवाई करत असले तरी देखील हा प्रश्न तसाच आहे…

- Advertisement -

वाहतूक पोलिसांनी गेल्या अडीच वर्षांत अडीच लाख वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल एक कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहराच्या महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. शहरात तीन पे अ‍ॅण्ड पार्क (Pay and Park) महत्वाच्या ठिकाणी असले तरी त्यातील असलेले अंतर हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांना बाजारपेठेत आल्यावर पार्किंग कुठे करायची हा प्रश्न सतावत आहे.

दरम्यान, करोनामुळे (Corona) व्यावसायिकांवर असलेले निर्बंध आता जवळपास पूर्णपणे उठविण्यात आलेले असल्याने गर्दी वाढत आहे.

महात्मा गांधी मार्ग (Mahatma Gandhi Road), सीबीएसचा स्मार्टरोड (CBS’s Smartroad), कॉलेजरोड (College Road), संभाजी चौक ते सिटी सेंटर मॉल चौक (Sambhaji Chowk to City Center Mall Chowk), मखमलाबाद नाका (Makhmalabad Naka), द्वारका परिसर (Dwarka Area) आदी महत्वाच्या रस्त्यांवर रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, गतवर्षी ३४ हजार ५१३ वाहनचालकांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन असा ६८ लाख ९१ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. विशेष म्हणजे टोइंग व्हॅन नसताना हा दंड झाला आहे. वाहतूक पोलिस आपल्यापरीने दंड वसुली करीत आहेत.

त्यामुळे मूळ प्रश्न सुटण्याऐवजी आणखी गंभीर झाला. आता टोइंग व्हॅन सुरू झाली आहे. दररोज शेकडो वाहने रस्त्यांवरून हटवून मालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे.

वर्ष…….प्रत्यक्ष केस……….दंड………..ऑनलाइन केस……..दंड

२०१९…….३६,७०९……….६८,०३,८००……..२,०२९………….४,०५,८००

२०२०…….६,४४४………..१२,७७,२००……..३८,०६९………..५६,१३,८००

२०२१…….८२०……………९,१९९…………..१,६४,०००……..१८, ३९, ४००

एकूण……४३,९७३………८०,९०,१९९…….२,०४,९८……….७८,५९,४००

- Advertisment -

ताज्या बातम्या