Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedउष्णतेचा कहर वाढणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

उष्णतेचा कहर वाढणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेने अक्षरश: कहर केला आहे. अनेक ठिकाणी आजही पारा चाळीशी पार करून गेला आहे. एप्रिल महिन्यात तपमानाने उच्चांक गाठला होता. आता मे महिन्यामध्ये उष्णतेचे चटके बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे….

- Advertisement -

पूर्व मोसमी पावसामुळे उष्णतेची लाट घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रपुरात 122 वर्षांतील सर्वात उच्चांक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

उष्णतेच्या लाटांमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आणखी काही दिवस सूर्याचा प्रकोप सहन करावा लागणार आहे.

काही ठिकाणी तर पारा 50 अंशाच्याही पुढे जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, झारखंडमधील नागरिकांना उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तापमानाचा पारा 44 अंशावर पोहचला. नाशिकमध्येही पारा ३८.१ अंशांवर गेला आहे. दोन दिवसांपूर्वी हा परा ४१ अंशांवर होता. तर किमानतपमानदेखील नाशिकमधील वाढलेले आहे. दोन दिवसांपूर्वी कमाल तपमान २४.४ अंशांवर गेले होते. तर काल (दि ३०) रोजी हे तपमान कमी होऊन २२.५ अंशावर स्थिरावले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या