शासकीय योजनेतंर्गत आदिवासी बालकावर हृदय शस्त्रक्रिया

jalgaon-digital
3 Min Read

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा (National Health Mission) भाग असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (National Child Health Programs) दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) दुर्गम अश्या विळवंडी गावातील

बेंडकुळे अळी अंगणवाडी (anganwadi) येथील तीन वर्षाच्या कार्तिक स्वप्निल बेंडकोळी या बालकाची मोफत व यशस्वी हृदयशस्त्रक्रिया (Heart surgery) नुकतीच मुंबईस्थित (mumbai) फोर्टिस हॉस्पिटल (Fortis Hospital) मधील प्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ञ डॉ. धनंजय मालनकर (Cardiologist Dr. Dhananjay Malankar), डॉ. स्वाती गरेकर, डॉ. भारत सोनी, डॉ. रोनक शाह व सहकार्‍यांनी केली.

आरबीएसके (RBSK) अंतर्गत नियमित वैद्यकीय तपासणी (Medical examination) दरम्यान एप्रिल महिन्यामध्ये सदर विद्यार्थ्यांची तपासणी (Examination of students) करण्यात आली होती. या प्राथमिक तपासणीत त्यास जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर नाशिक (nashik) येथील विजन हॉस्पिटल येथे मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटल च्या तज्ञ डॉक्टरांची टीम दर महिन्याला विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी येते. त्या तपासणी दरम्यान बालकाला अत्यंत गुंतागुंतीचा हृदयाचा विकार असल्याचे आढळले.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. समीर काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकाला मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटल (Fortis Hospital) मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेंतर्गत (National Child Health Programs) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. 7 जुलै रोजी ढजऋ या अत्यंत गुंतागुंतीच्या आजाराची अवघड हृदय शस्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयांतर्गत एकूण 6 पथके कार्यरत असून ते तालुक्यातील अंगणवाडी व शाळा स्तरावर जाऊन बालकांच्या आरोग्याची तपासणी करत आहेत.

याचाच एक भाग म्हणून पथकातील डॉ. तुषार पाटील, डॉ. गौरी निर्हाली, औषधनिर्माण अधिकारी सोनिया पावरा, परिचारिका हिरा अवतार यांनी याकामी परिश्रम घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्र कोचरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. खोकले तसेच एकात्मिक बाल विकास केंद्र अंतर्गत बेंडकुळे अळी येथील अंगणवाडी सेविका सौ सुनीता ठेपणे यांनी बालकांच्या नातेवाईकांना शास्त्रकियेची आवश्यकता तसेच बाळाचे आरोग्य याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे पालक शस्त्रकिया करून घेण्यास लवकर तयार झाले.

नाशिकचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात (Nashik District Surgeon Dr. Ashok Thorat), निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधिक्षक बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर काळे, सीडीपीओ राकेश कोकणी व विलास कव्हळे, आरबीएसकेचे जिल्हा समन्वयक अधिकारी दीपक चौधरी, संदीप पाटील व फोर्टिस रुग्णालयाचे पेशंट कोऑर्डिनेटर विजय सावंत यांचे याकामी अनमोल सहकार्य लाभले

आदिवासी भागातील पालकांना मुंबईसारख्या शहरामध्ये मिळालेल्या मोफत सुविधेमुळे पालक खूप खुश होते. अंगणवाडीतील तपासणी झाली नसती तर कार्तिक स्वप्निल बेंडकोळी या बाळाची ही शस्त्रक्रिया आर्थिक परिस्थितीमुळे करू शकले नसते. त्यामुळे या डॉक्टरांचे आभार मानतो.

– वसंतराव थेटे, माजी उपसभापती पं.स.दिंडोरी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील वय वर्ष 0 ते 6 वयोगटातील बालकांची वर्षातून 2 वेळा व शाळेतील 6 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा सखोल आरोग्य तपासणी केली जाते. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा फुले जीवनदायी योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून व सामाजिक संस्थेद्वारे वैद्यकीय मदत मिळवून दिली जाते.

– डॉ. सुभाष मांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी

दिंडोरी तालुक्यात आरबीएसके कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत अंगणवाडीतील 73 विद्यार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत तर शाळेतील 68 विद्यार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.

– डॉ. समीर काळे, बालरोगतज्ज्ञ, दिंडोरी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *