Sunday, May 5, 2024
Homeनगरआरोग्य कर्मचार्‍याची 45 हजाराची फसवणूक; गुन्हा दाखल

आरोग्य कर्मचार्‍याची 45 हजाराची फसवणूक; गुन्हा दाखल

भेंडा |वार्ताहर| Bhenda

तुमचे क्रेडीट कार्ड (Credit Card) चालू करुन देतो असे म्हणुन बँक खात्यातून वेळोवेळी एकुण 45 हजार रुपये काढून घेवून फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत हल्ली भेंडा (Bhenda) येथे राहणार्‍या वडचुना ता.औसा (जि. हिंगोली) येथील विजय कैलासराव चिलगर (वय 39) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) दिलेल्या फिर्यादित म्हटले की, मी भेंडा येथे राहण्यास असून तेलकुडगाव येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून नोकरीस आहे. मी माझे वापरासाठी क्रेडिटकार्ड घेतले असून ते मी वापरतो आहे.

मी पुन्हा येईनची दहशत आद्याप कायम

3 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ड्युटीवर असताना मला माझ्या मोबाईल नंबरवर एका नंबरवरुन फोन आला. सदर इसम मला म्हणाला की, तुमचे एसबीआयचे क्रेडीट कार्ड बंद झाले आहे. तुम्हाला त्याचे नुतनीकरण करायचे असेल तर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो सांगा. सदर इसमाने माझ्या क्रेडीट कार्डचा नंबर सांगीतला. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसला. मी त्याला ओटीपी सांगीतला. तुम्हाला पुन्हा ओटीपी येईल तोही तुम्ही मला सांगा असे त्याने सांगीतल्याने मी त्यास दोन-तीन वेळेस ओटीपी सांगीतला. तुमचे कार्ड संध्याकाळी चालू होईल असे त्याने सांगीतले.

विरोधकांना आम्ही तिघे संताजी-धनाजीसारखे दिसतो

त्यानंतर मला त्याच मोबाईल नंबरवरुन सायंकाळी फोन आला व त्याने मला एक लिंक पाठवली. त्या लिंकवर त्यांनी मला क्लीक करण्यास सांगीतले असता मी त्यावर क्लीक केले असता माझ्या खात्यामधुन 9 हजार 637 रुपये 17:15 वाजता व 4 हजार 998 रुपये सुमारे 17:26 वाजता असे एकुण 14 हजार 635 रुपये कट झाले.

त्यानंतर माझ्या लक्षात आले की सदर इसमाने नाझी फसवणुक केली आहे. त्यानंतर मी सकाळी एस.बी.आय शाखा यांच्याकडे जावून विचारपुस केली असता माझे क्रेडीट कार्डवरुन एकुण 30 हजार 395 रुपये तसेच फोन पे वरुन 14 हजार 635 रुपये असे एकूण 45 हजार 30 रुपये फसवणूक करुन काढुन घेतले आहे.

या फिर्यादीवरुन फसवणूक करणार्‍या अज्ञात इसमाविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर उलटून एक जण ठार

- Advertisment -

ताज्या बातम्या