Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाईन पद्धतीने

आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाईन पद्धतीने

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा Maharashtra University of Health Sciences एकविसावा दीक्षांत सोहळा Convocation ceremony सोमवारी (ता. 7) ऑनलाइन पद्धतीने होईल.

- Advertisement -

कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Chancellor and Governor Bhagat Singh Koshyari अध्यक्षस्थानी असतील. प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख पाहुणे राहतील, अशी माहिती कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली.

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या दहा हजार 236 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

विविध विद्याशाखांमधील गुणवत्ताप्राप्त केलेल्यांना 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, रोख रक्कम, पारितोषिक व 38 विद्यार्थ्यांना पीएच. डी. प्रदान करण्यात येईल. दीक्षांत सोहळा विद्यापीठ अधिसभागृहात सकाळी अकराला होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या