Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! आरोग्य अधिकारी, कर्मचारी सुट्टीवर; रुग्णालयात आईनेच केली मुलीची प्रसुती

धक्कादायक! आरोग्य अधिकारी, कर्मचारी सुट्टीवर; रुग्णालयात आईनेच केली मुलीची प्रसुती

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

अवघ्या काही दिवसांवर महिला दिन (Women’s day) येऊन ठेपला आहे. या दिवशी मोठ्या उत्साहात महिलांचा मान सन्मान केला जातो. या कार्यक्रमात महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत असून आज कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचे सांगितले जाते. मात्र, जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची (Pregnant Woman) डॉक्टर नसल्याने स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याची धक्कादायक घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर (Trimabkeshwer) तालुक्यातील आव्हाटे जवळील बरड्याचीवाडी येथील एक महिला प्रसूतीसाठी अंजनेरी (Anjaneri) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने आईलाच (Mother) मुलीची प्रसूती करावी लागली.

काश्मिरी पंडितांच्या हत्या प्रकरणावरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

यशोदा त्र्यंबक आव्हाटे असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव असून आज सकाळी या महिलेस प्रसूती कळा जाणवत असल्याने आई सोनाबाई आव्हाटे यांच्याबरोबर अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. याठिकाणी दाखल झाल्यानंतर आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हता. यावेळी यशोदा आव्हाटे यांच्या प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा सेविकांनी प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून तिच्या जुजबी अनुभवानुसार प्रसूती केली. यावेळी या महिलेने एका गोंडस मुलीला (Girl) जन्म दिला.

तहसील कार्यालयातील वाहनचालक दीड लाखांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

दरम्यान, या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली आहे. तसेच तालुक्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची अशीच परिस्थिती असून एकही डॉक्टर मुख्यालयात राहत नाही. त्यामुळे येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनी रास्ता रोको आंदोलन (Agitation) करणार असल्याचे मधे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या