शाळा, धार्मिक स्थळे, टप्प्याटप्याने सुरू करणार

jalgaon-digital
4 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,

बाब मंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी बोलून घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांना रात्री बारा वाजेच्या सुमारास फोन लावला, मात्र आऊट ऑफ रेंज असल्याने संपर्क झाला नाही.

दरम्यान, राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू या, असे मत मंत्री टोपे यांनी व्यक्त केले. राज्यात सुमारे 15 लाख लोकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी 13 लाख बाधित ठणठणीत होऊन घरी गेले आहे.

काही बाधित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. आता बांधितांची संख्या कमी होत आहे. लोकांनी शिस्त पाळली, नियम पाळले तर बाधिताचा आकडा आणखी खाली येईल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकार हे अंत्यत पारदर्शकपणे व जमेल तेवढ्या कार्यक्षमतेने कोरोना काळात काम करण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यामधून लक्ष विचलित करण्यासाठी काही मंडळी जाणीवपूर्वक काम करीत असतील, तर ते निश्चित चुकीचे आहे, असा टोलाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजपच्या नेत्यांना यावेळी लगावला.

अशी अपेक्षा करू या, असे सुचक विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. टोपे यांच्या या विधानातून नगरसह राज्यातील लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळू शकतो, असेही संकेत आहेत.

शुक्रवारी रात्री उशीरा आरोग्य मंत्री टोपे नगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. जालन्याला जातांना काही वेळी नगरमध्ये थांबले होते. यावेळी ते म्हणाले, राज्यात करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचे दर कमी करून ते 800 रुपयांवर आणण्याचा विचार सुरू आहे.

नगरमध्ये खासगी हॉस्पिटलला पुरविले जाणारे ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली असून ही

योग्य मंडळींचे राष्ट्रवादीत स्वागतच

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येण्याची चर्चा आहे, या प्रश्नावर टोपे यांनी सूचक वक्तव्य केले. राष्ट्रवादीमध्ये योग्य मंडळींचे नेहमी स्वागतच करतो. पक्ष कर्तव्यवान माणसाला नेहमी स्वीकारत असतो. प्रत्येक पक्षात कर्तव्यवान लोक असतात. त्या दृष्टीकोनातून मला वाटते की कोणी पक्षात येऊ इच्छित असतील, तर राष्ट्रवादीच्या नेते मंडळीनी जिल्ह्याजिल्ह्यामध्ये चांगल्या लोकांना वाट करून दिली पाहिजे, असे सांगतानाच, मी एका व्यक्तीचे नाव घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीमध्ये एखादी व्यक्ती आल्यास त्या-त्या जिल्ह्यातील लोकांवर बाधा येईल किंवा ते मागे पडतील, असा कोणताही भाग नसतो. आपल्याला पक्षही वाढवायचा असतो. सर्वांना घेऊन काम करायचे असते, व ती मानसिकता ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

खासगी हॉस्पिटलमधील लुटीची घेतली दखल

नगरमध्ये काही खाजगी रूग्णालयांकडून लूट होत असल्याकडे मंत्री टोपे यांचे लक्ष वेधले. प्रशासन कारवाई करत नाही ही मंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर टोपे यांनी कारवाईचे सर्व अधिकार स्थानिक अधिकार्‍यांना दिले असल्याचे सांगितले. चूकीचे होत असेल ते कारवाई करा अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. नगरमधील खासगी हॉस्पिटलच्या लुटीसदंर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले जातील. ज्यांची लूट झाली असेल त्यांना जास्तीचे पैसे परत मिळवून दिले जातील. फक्त खात्रीशीर बिलं संबंधितांनी द्यावी. त्या हॉस्पिटलवर कारवाई निश्चित होईल असे टोपे म्हणाले.

टीआरपी घोटाळ्यात पोलीसांना बदनाम करण्याचे काम

टीआरपी घोटाळ्यात कायद्याच्या अनुषंगाने धूळफेक करण्याचे काम काही चॅनलने केले आहे. ते सर्वजण शिक्षेस पात्र आहेत. यासर्वांना कायद्याच्या बडग्याच्या माध्यमातून कठोरातकठोर शिक्षा होण्याची गरज आहे. राज्यातील यंत्रणेला, पोलीस विभागाला विनाकारण बदनाम करण्याचे काम काही लोक जर करीत होते, तर आता दूध का दूध पानी का पानी हे सिद्ध झाले आहे, असे मत मत्री टोपे यांनी मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याबाबत बोलताना व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *