Thursday, April 25, 2024
Homeनगरडॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरण : पाथर्डी तालुका आरोग्याधिकार्‍यांवर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश

डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरण : पाथर्डी तालुका आरोग्याधिकार्‍यांवर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश

करंजी |वार्ताहर| Karanji

करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्याप्रकरणी (Karanji Primary Health Center Dr. Ganesh Shelke Suicide Case) तालुका आरोग्य अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश (Taluka Health Officer Order to action) आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांना दिले (Health Minister Rajesh Tope to Commissioner of Health action order) असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे (Sambhaji Dahatonde) यांनी दिली आहे.

- Advertisement -

डॉ. शेळके यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट प्रमाणे एकही वरिष्ठ अधिकार्‍यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. डॉ. शेळके यांना न्याय मिळवून देण्यासाठी दहातोंडे यांनी आरोग्य मंत्री टोपे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांची भेट घेऊन संबंधित सर्व अधिकांर्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच डॉ. शेळके यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 लाखांची मदत करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ शासन सेवेत घेण्यात यावे, अन्यथा मंत्रालयासमोर बहिरवाडी, डांगेवाडी, करंजी ग्रामस्थांसह महासंघाचे पदाधिकारी मोर्चा काढतील, असा इशारा (Hint) दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या