Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशराजस्थानमध्ये प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण

राजस्थानमध्ये प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण

जयपूर –

राजस्थानमधील प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला

- Advertisement -

आहे. त्यासाठी आज गुरुवारापासूनच नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता राजस्थानमधल्या प्रत्येक कुटुंबाची विमा पॉलिसी असणार आहे. असं करणारं राजस्थान हे पहिलंच राज्य ठरणार आहे. राजस्थान सरकारने आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात यासंदर्भातली घोषणा केली होती.

त्यानुसार ‘मुख्यमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य विमा योजने’साठी राजस्थानमध्ये नोंदणी सुरू झाली असून त्यानुसार संपूर्ण राज्यच आरोग्य विमा योजनेमध्ये समाविष्ट केलं जात असल्याची माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोकसिंह गेहलोत यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.

राजस्थान सरकारची सर्वांसाठी कॅशलेस उपचार योजना म्हणजेच मुख्यमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य विमा योजना आजपासून राज्यात सुरू झाली आहे. राजस्थानच्या सर्व नागरिकांना वैद्यकीय उपचार पुरवण्यासाठीची ही आमची एक महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे देशभरात राजस्थान अशा प्रकारची प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचं आरोग्य विमा संरक्षण पुरवणारं पहिलं राज्य ठरलं आहे, असं गेहलोत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

करोना काळामध्ये आधी उपचार आणि नंतर रुग्णालयाचा खर्च या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्या प्रमाणे केंद्र किंवा इतर राज्य सरकारांच्या आरोग्य व्यवस्थेवरील खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे घराघरांत देखील महिन्याच्या खर्चात आरोग्यविषयक गोष्टींवर होणार्‍या खर्चात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या