Video : गोंधळातील ‘ती’ आरोग्य विभागाची परीक्षा ‘एमपीएससी’कडून घ्या!

नाशिक | प्रतिनिधी

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान शहरातील सीएमसीएस कॉलेजच्या केंद्रावर काल (दि २८) रोजी दोन विद्यार्थ्यांना एका बेंचवर बसून परीक्षा द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याठिकाणी प्रचंड गोंधळ काल झाला होता तद्नंतर आज आरोग्य उपसंचालाक यांना काही विद्यार्थी भेटले असून पाच हजारापर्यंत झालेला खर्च परत मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे…

या निवेदनात काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सीलबंद नव्हत्या. पर्यवेक्षक त्या तशाच घेऊन आले होते.

एका बाकावर एकाच विषयाचे पेपर देणारे दोन विद्यार्थी बसले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर इथे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला होता.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थी मोबाईल सोबत ठेवून पेपर देताना दिसून आले. परीक्षेचे माध्यम मराठी असतानाही इंग्रजीतून प्रश्न आलेले होते. यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूकच झाली. त्यामुळे अशी परीक्षा ज्यास कुठलाही काहीही अर्थ नाही. म्हणून या परीक्षेचे नियोजन एमपीएससीकडे द्यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी आरोग्य उपसंचालक यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील विविध केंद्रांवर रविवारी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गंगापूररोडवरील सीएमसीएस कॉलेजमध्ये सकाळच्या सत्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञपदाच्या परीक्षेदरम्यान एक हजार ९०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हजेरी लावली.

येथे एका बेंचवर दोन विद्यार्थी बसविण्याचा प्रकार परीक्षा केंद्रावर सुरू झाला. विद्यार्थी, पालकांनी याला विरोध केल्यामुळे परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला. अखेर गंगापूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला होता.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *