Thursday, April 25, 2024
Homeनगरउत्तर प्रदेश प्रशासनाकडून गुंड प्रवृत्तीला खतपाणी

उत्तर प्रदेश प्रशासनाकडून गुंड प्रवृत्तीला खतपाणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस या जिल्ह्यात वाल्मिकी मेहतर समाजाच्या निरपराध तरुणीची काही तरुणांनी बलात्कार करून

- Advertisement -

नंतर निर्घृण हत्याकांड घडवून आणले. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ प्रांत कार्यालय येथे नगरसेविका प्रणिती चव्हाण, दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व तालुका सकल पंचच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी श्री. धनवटे, अंतोन शेळके, राहुल आठवाल, आदी समाज बांधवांनी आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या.

प्रास्ताविक भाषणात दीपक चव्हाण यांनी हाथरसचे खासदार पीडित कुटुंबियांना भेटून मदत करण्याऐवजी कारागृहात आरोपींची भेट घेतात तर उत्तर प्रदेश प्रशासन गुंड प्रवृत्तीला खतपाणी घालतात याचा निषेध म्हणून 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांना संपूर्ण जिल्ह्यातून समाज बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती दिली.

यावेळी नगरसेविका जयश्री शेळके, योगेश बोरूडे, चेअरमन प्रकाश सपकाळ, संजय झिंगारे, अंकुश जेधे, बंटी चव्हाण, अनिकेत दाभाडे, अक्षय चव्हाण, राजू दाभाडे, आनंद चावरे, लाखन दाभाडे, किरण सोळंकी, दिनेश बागडे, शंकर कंडारे, जीवन धनसिंग, राजु कचरे, राकेश खरारे, अजय बागडे, मुन्ना जेधे, अमर दाभाडे, भारत दाभाडे, चेतन बागडे, मयूर चव्हाण, राहुल कंडारे, रूपेश करोसिया, राकेश झिंगारे, सचिन चंडाले, राजू गोयर, सतीश गायकवाड, यशवंत चव्हाण, प्रसाद चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आभार नगरसेविका प्रणिती चव्हाण यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या