Saturday, April 27, 2024
Homeनगरदोन ठिकाणी हातभट्टी पकडली

दोन ठिकाणी हातभट्टी पकडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) दोन ठिकाणी हातभट्टी दारू विक्रीवर छापे (Hatbhatti Liquor Police Raid) टाकले. या ठिकाणी सुमारे पाच हजार रूपये किंमतीची हातभट्टी दारू जप्त (Hatbhatti Liquor Seized) करण्यात आली आहे. या प्रकरणी दारू विक्री करणार्‍या दोघांविरूध्द तोफखाना पोलिसांत (Topkhana Police) गुन्हे दाखल (Crime Filed) करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सुभाष श्रावण शिंदे (वय 45 रा. गांधीनगर, बोल्हेगाव), अमन हमीद शेख (वय 40 रा. कोठला, घासगल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुभाष शिंदे हा बोल्हेगाव (Bolhegav) परिसरातील गांधीनगरमध्ये (Gandhinagar) हातभट्टी दारूची विक्री करत असताना मिळून आला आहे.

तर अमन शेख हा एसटी कॉलनी परिसरात हातभट्टी विक्री करत असताना मिळून आला आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, परि. पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोलीस अंमलदार शफी सय्यद, सतीष त्रिभुवन, शैलेश गोमसाळे, संजय करांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या