Saturday, April 27, 2024
Homeनगरहसनापूर विकास सोसायटी निवडणूक 40 वर्षांनंतर बिनविरोध

हसनापूर विकास सोसायटी निवडणूक 40 वर्षांनंतर बिनविरोध

लोणी |वार्ताहर| Loni

ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुकीत एकमेकांशी कडवा संघर्ष करणार्‍या हसनापूरच्या ग्रामस्थांनी रमजानच्या पवित्र महिन्यात कटुता टाळून विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली. गेल्या 40 वर्षानंतर ही निवडणूक बिनविरोध करून गावाने एकोप्याचे दर्शन घडवले असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचे समजले जाणारे लोणी जवळचे हसनापूर गाव दोन गटातील राजकीय संघर्षामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. हसनापूरच्या विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय जाणकारांचा ही निवडणूक गाजणार असा अंदाज होता. मात्र गावकर्‍यांनी तो अंदाज चुकीचा ठरवला. रमजानच्या पवित्र महिन्यात राजकीय संघर्ष आणि कटुता नको अशी सामंजस्याची भूमिका ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्याला ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणार्‍या जनसेवा मंडळाच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी विचारविनिमय करून उमेदवार निश्चित केले आणि निवडणूक बिनविरोध केली. त्यासाठी अल्ताफ पापा पटेल, असलम सिराजुद्दीन पटेल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तर ज्येष्ठ कार्यकर्ते हाजी अब्बास पटेल, फकीर महंमद दाऊद पटेल, पीरमहंमद पटेल, शेख साहब, अन्वर इब्राहिम शेख, सुलेमान पटेल, मुस्ताक इस्माईल पटेल, नासिर सुभेदार, सरपंच सौ. बारशे, उपसरपंच अफजल पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले.

13 जागांसाठी 37 अर्ज दाखल झाले होते. 24 जणांनी अर्ज मागे घेत 13 जणांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा करून दिला. नूतन संचालकांमध्ये पिरमहंमद अब्दुल पटेल, नासिर लतीफ पटेल, गुलाब इस्माईल पठाण, अब्दुल कादर गणी पटेल, आरशु हसन पटेल, रिजवान दादा पटेल, चाँद दादा पटेल, खालीक महंमद पटेल, इशरनजहाँ सुलतान पटेल, आलिया शब्बीर पटेल, महेश रामदास जानवेकर, विठ्ठल एकनाथ माळी व बाळाजी भानुदास बैरागी यांचा समावेश आहे.

नूतन संचालकांचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदू राठी, उपाध्यक्ष सुनील जाधव आदींनी अभिनंदन केले. निवडणूक अधिकारी म्हणून राहात्याचे सहाय्यक उपनिबंधक श्री. खेडकर यांनी तर सहाय्यक म्हणून श्री. पाटील व श्री. ब्राह्मणे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या