Wednesday, April 24, 2024
Homeनगरविखे पाटील महाविकास आघाडीत परतणार – पालकमंत्री मुश्रीफ

विखे पाटील महाविकास आघाडीत परतणार – पालकमंत्री मुश्रीफ

थेट सरपंच निवडीसाठी आता कायदा

अहमदनगर (प्रतिनिधी) – काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा महाविकास आघाडीत येणार असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाचा अध्यादेश काढण्यासाठी राज्यपालांनी येत्या अधिवेशनात बिल पास करण्याची सुचना दिली आहे. त्यानूसार अधिवेशानात बिल पास झाल्यानंतर याबाबतचा अध्यादेश निघेल. यापुढे सरपंच यांची निवड ही थेट जनतेतून नव्हे, तर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांतून होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ना. मुश्रीफ बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. राज्यातील आघाडी सरकार कोसळेल असे भाजपकडून सातत्याने सांगण्यात येत असल्याकडे मंत्री मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता, राज्यात सत्ता गेल्याच्या झटक्यातून अद्याप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सावरलेले नाहीत. त्यामुळे सरकार कोसळणार असे रात्रंदिन त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील जलयुक्त कामांची चौकशी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगतले. आढावा बैठकीत आ. बबनराव पाचपुते

यांनी अनेक तक्रारी केल्या असून त्यांची चौकशी करण्यात येईल. मागील सरकारने जे प्राधान्याने करावयाचे होते ते केले नाही. यामुळे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.  जोपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या एकवाक्यता आहे, तोपर्यंत या सरकारला धोका नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार 15 टिकेल असा विश्‍वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. विखे पाटील महाविकास आघाडीत परत येतील. ते काँग्रेस विचारांचे आहेत. विखे पाटील नाईलाजाने तिकडे गेले आहेत, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या