Saturday, April 27, 2024
Homeनगरशेतीसाठी हनिकारक कीटकांसाठी सौर प्रकाशाचा सापळा

शेतीसाठी हनिकारक कीटकांसाठी सौर प्रकाशाचा सापळा

संगमनेर |संदीप वाकचौरे| Sangmner

लॉकडाऊन च्या कालावधीत शेतीच्या समस्या समोर आल्या आणि त्यावर मात करण्यासाठी अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी शेतीसाठी हानीकारक ठरणार्‍या

- Advertisement -

सौर प्रकाश दिव्या च्या मदतीने सौर प्रकाश सापळा तयार केला. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीत त्पादनात वाढ होईल आणि पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबण्यास मदत होईल असा दावा करण्यात आला आहे.

अभियांत्रिकी पदवी धारण केलेले स्वानंद डोंगरे व किरण नवले या शिक्षण घेतलेले विद्यार्थी लॉक डाऊन सुरू झाल्यावर घरीच होते. यादरम्यान शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेऊन करण्यासाठी त्यांनी विचार सुरू केला. शेतीला सर्वाधिक फटका निसर्गात हानीकारक असलेल्या कीटकांपासून बसतो.

या कीटकनाशकांना मारण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. त्याचा परिणामही पर्यावरणातील आवश्यक असणार्‍या व पूरक ठरणार्‍या कीटकांना बसतो. ही बाब लक्षात घेऊन या दोघांनी सौर प्रकाश किटक सापळा निर्माण करण्याची कल्पना सुचली. त्याची निर्मिती केल्यानंतर त्यांनी त्यासाठी पथदर्शक अभ्यासही सुरू केला आणि हे हा स्वयंचलित सापळा शेतकर्‍यांना पूरक ठरल्याचे लक्षात आले.

स्वयंचलित व पर्यावरण पूरक सापळा

पर्यावरणाला हानिकारक ठरणारे कीटक सायंकाळी सूर्यास्तानंतर पाच सहा तास साधारणपणे अवतीभोवती राहतात. त्यासाठी अतिनील किरणांचा दिवा सौर पॅनलला लावण्यात आला. यास अतिनील दिव्याकडे हे हानी कारक कीटक आकर्षित होतात. त्या भोवती फिरतात आणि खाली असलेल्या पाण्यामध्ये पडतात. त्यात त्यांचा मृत्यू होतो. मात्र मित्रकीटक मरत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होणे थांबते. यासाठी तयार करण्यात आलेला चैनल वरती लावण्यात आलेला दिवस हा स्वयंचलित आहेत. तो सूर्यास्तानंतर सुरू होतो आणि पाच तासानंतर आपोआप बंद होतो. यासाठी शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे त्याकडे लक्ष देण्याची गरज पडत नाहीत. दहा वेट साठी चा सौर पॅनल तयार करण्यात आला असून अतिरिक्त चार्ज होणे घडत नाहीत.

एकरी एक युनिट पुरेसे

सौरप्रकाश किटक सापळा तयार करण्यात आल्यानंतर एका एकरासाठी केवळ एक युनिट पुरेसे ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती हानिकारक कीटक मारले जातील त्यातून शेती उत्पादनावर कीटकनाशक फवारणीचे एकरी 15 ते 20 हजार रुपयात बचत होईल असा दावा करण्यात आला आहे. या सौर प्रकाश दिव्यांमुळे मित्र कीटक मृत्यू पावणार नाहीत त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी या माध्यमातून मदत होणार आहेत.

आरंभी या स्वरूपाची सौरप्रकाश सापळे निर्माण केल्यानंतर त्याचा पथदर्शक स्वरूपात अभ्यास करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये 50 ते 60 कीटकनाशक सौरभ प्रकाश सापळे तयार करण्यात आले. ते नाशिक, संगमनेर परिसरात बसविण्यात आले. याचा लाभ होत आहे. टोमॅटो पिकामध्ये हा दिवा बसविल्यामुळे अधिक लाभ झाला आहे. तो हानिकारक किटक या दिव्यामुळे मरतात व शेतकर्‍यांना होणारे नुकसान टळते. कीटकनाशक आवर्ती होणार्‍या खर्चातही बचत होते.

– तुकाराम गुंजाळ, शेतकरी

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना नवनवीन संशोधन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असला तरी स्थानिक गरजा लक्षात घेऊन संशोधन करण्यात येत नाहीत. कृषी उद्योगात मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. त्यादृष्टीने हे क्षेत्र व्यापक संधी उपलब्ध करून देत असले, तरी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी जगाकडे लक्ष ठेवून संशोधनाकडे कल विद्यार्थ्यांचा वाढतो आहे. आम्ही शेतीच्या समस्या लक्षात घेऊन या स्वरूपाचे संशोधन सुरू केले आणि त्याचा लाभ शेतकर्‍यांना होत आहेत. पुढच्या काळातही शेतीला मदत करणारे संशोधन पूरक तंत्रज्ञान विकसित करण्याकडे कल असेल. प्रस्ताव करणार आहे.

– प्रा. स्वानंद डोंगरेे, अभियांत्रिकी

शेतीसाठी पर्यावरणात असणार्‍या सर्वच किटकांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत नाही. काही कीटक हे शेतीसाठी चे मित्र कीटक आहेत. त्यामाध्यमातून शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी मदत होत असते. ही बाब लक्षात घेऊन या दिव्यांचा मित्र किटकांवर परिणाम होत नाही, तर केवळ पाच तास शेतीच्या परिसरात असलेल्या एक एकर च्या कार्यक्षेत्रातील हानिकारक किटक मृत पावतात. त्यामुळे हे सापळे खर्च वाढवत नाही. शेतकर्‍यांना अत्यंत अल्प खर्चात हे सापळे वापरणे शक्य आहे.

– प्रा. किरण नवले, अभियांत्रिकी

- Advertisment -

ताज्या बातम्या