Thursday, April 25, 2024
Homeनगरहरिश्चंद्रगडावर भरकटल्याने पर्यटकाचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावर भरकटल्याने पर्यटकाचा मृत्यू

अकोले |प्रतिनिधी| Akole

हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad) पर्यटनासाठी (Tourism) आलेल्या एका पर्यटकाचा भरकटल्यामुळे दुदैवी मृत्यू (Tourist Death) झाला आहे. मयत पर्यटकाचे नाव बाळू नाथराम गिते (रा. कोहगाव, पुणे) असे आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून (Pune) सहा तरुण हरिश्चंद्र गडावर (Harishchandragad) पर्यटनासाठी आले होते. एक तारखेला सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान त्यांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली होती, मात्र धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने दोन दिवस हरिश्चंद्र गडाच्या (Harishchandragad) जंगलात कपारीत ते मुक्कामाला होते अशी माहिती मिळाली आहे.

वाळूच्या लिलावावरून थोरात-विखे पाटील भिडले

हरिश्चंद्रगड (Harishchandragad) परिसरात असणारी थंडी आणि पावसाने गिते नावाच्या पर्यटकाची प्रकृती खालावल्याने तसेच रात्रभर थंडीने वाढल्याने बुधवारी सकाळी 10 वाजता त्या पर्यटकाचा मृत्यू (Tourist Death) झाला. बाळू नाथाराम गिते असे मयत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. मयत बाळू गिते यांच्यासोबत अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तीपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सर्व पुण्यातील (Pune) कोहगाव (Kohgav) येथील राहणारे पर्यटक हरिश्चंद्रगडावर येतांना जंगलात फिरतांना रस्ता भरकटले होते.

शिर्डीनजीक रुई शिवारात हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

मुंबई (Mumbai) येथील एका ग्रृपने गाईड बाळू रेंगडे यास सदर घटनेची माहिती दिली. बाळू रेंगडे हे रात्रीच घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी तोलारखिंड येथील तपासणी नाक्यावरील वन संरक्षक मजूर महादू भांगरे, विजय नाडेकर, गौरव मेमाने, शरद भांगरे आणि राजूर पोलिसांनी (Rajur Police) पाचनई गावकरी आणि वनविभागाच्या मदतीने मयत व्यक्तीसह बाकीच्या पर्यटकांना गडावरून रेस्क्यू करून खाली आणले असून त्यातील तीन जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बाळू गीते यांचा मृतदेह तपासणीसाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. मुंढे व पो. कॉ. सांगळे हे करत आहे.

किरण आहेर विरुद्ध खोटी फिर्याद देणार्‍या महिलेविरुद्ध लोणीत गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या