Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाHardik Pandya ला झालं तरी काय? एका मुलाचा बाप झाल्यानंतर आता पुन्हा...

Hardik Pandya ला झालं तरी काय? एका मुलाचा बाप झाल्यानंतर आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार?

एकीकडे के. एल. राहुल- आथिया शेट्टीचं रॉयल लग्न लागताच आता भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसत आहे.

कारण हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचने (Natasa Stankovic) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे.

- Advertisement -

येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच वॅलेंटाइन डेला हार्दिक आणि नाताशा उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. त्यांचा विवाहसोहळा शाही असणार आहे.

तसेच त्यांच्या विवाहसोहळ्याला इंडस्ट्रीमधील दिग्गज लोकांना बोलावण्यात येणार आहे.

हार्दिक आणि नताशाच्या लग्नाच्या विधींची सुरुवात ही १३ फेब्रुवारीपासून होणार आहे. १३ ते १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाचे विधी पार पडणार आहेत.

उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान हार्दिक आणि नताशा, ३१ मे २०२० रोजी घरगुती पद्धतीने लग्न केले होते.

या जोडप्याला जुलै २०२० मध्ये त्यांचा मुलगा अगस्त्य झाला. मात्र या लग्ना संदर्भातील पुष्टी अद्याप तरी हार्दिक व नताशाने केलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या