Saturday, April 27, 2024
Homeनाशिककठोर परिश्रम, प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली!

कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नरोगी समुदाय आणि व्यावसायिक कॉम्प्लेक्स तयार करून विलक्षण जीवनशैली तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा याला पर्याय नाही. अडचणी सर्वांनाच येतात. मात्र त्यावर मात करून अविरतपणे आपले कार्य सुरू ठेवतो तोच जीवनात नक्की यशस्वी होतो.

- Advertisement -

25 हून अधिक वर्षांचा एकत्र अनुभव असलेले अटल, बागमार व हंसवाणी यांनी एबीएच कन्स्ट्रक्शनची स्थापना केली. शहरातील अनेक मोठे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. ग्राहकांना चांगल्या उत्पादनांची अपेक्षा असते. ज्ञानामुळे आपण जुन्याच गोष्टी नवीन पद्धतीने करण्याचे मार्ग शोधू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन प्रशांत बागमार या क्षेत्रात उतरले. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नाशिकमध्येच झाले.

शालेय जीवनात सुटीच्या दिवशी खेळत बसण्यापेक्षा वडिलांना सायकल दुकानात ते मदत करत. तेथील कामाची माहिती जाणून घेणे, स्वतः कामकाज पाहणे यातूनच व्यवसायाचे त्यांना बाळकडू मिळाले. त्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवसायात असताना त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. आता गेल्या 7 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचे आधुनिकीकरण, व्यावसायिकरण करण्यासोबतच बांधकामातील ग्राहकाभिमुख बदल त्यांनी केले.

आपल्या अनेक प्रकल्पांद्वारे ग्राहकांना उत्कृष्ट जीवनशैली व सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रहिवाशांचे राहणीमान आणि व्यावसायिक जागा सुधारतील, त्यांच्या व्यवसायाची गुणवत्ता सुधारेल, अशी घरे ‘एबीएच’मध्ये अशी तयार केली जातात. एक विश्वासार्ह विकसक म्हणून ‘एबीएच’ टीकाऊ आणि पर्यावरणाला अनुकूल घरे आणि व्यावसायिक जागा विकसित करून पर्यावरणाला सकारात्मक योगदान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे प्रशांत बागमार आवर्जून सांगतात. या वैशिष्ट्यांमुळे दर्जेदार घरे, दुकाने, कार्यालये जिथे आनंदी समुदाय राहतात. खेळतात. काम करतात आणि वाढतात, अशी त्यांची धारणा आहे. कोणतेही बांधकाम उत्तम दर्जाचे आणि वेळेवर पूर्ण व्हावे, या गोष्टीची ते खबरदारी घेतात.

सध्या गंगापूर रोड येथे ‘एबीएच ट्री-लँड’ हा नाशिकमधील अपार्टमेंट्सचा भव्य प्रकल्प सुरू आहे. तेथे प्रशांत बागमार, निशित अटल व रितेश हंसवानी या त्यांच्या व्यावसायिक भागीदारांसोबत काम पाहत आहेत. ‘एबीएच ट्री-लँड’ हा उत्तम सोयीसुविधांयुक्त प्रकल्प आहे. 2, 3 व 4 बीएचके लक्झरिअस अपार्टमेंट्स येथे उपलब्ध असतील. ‘ट्री-लँड’च्या मास्टर प्लॅनमध्ये एक अद्वितीय डिझाइन आहे. त्यात जागतिक दर्जाची जीवनशैली आणि नाशिकमधील अपार्टमेंटमध्ये प्रतिष्ठित निवास व्यवस्था आहे. एबीएच डेव्हलपर यांचे इतर तीन आगामी प्रकल्प आहेत, त्यात कॉलेज रोड येथे बी स्क्वेअर हा व्यावसायिक, आरटीओ ऑफिससमोर व्यावसायिक शॉप्स 44 रो-बंगलो व 196 फ्लॅट असलेला ‘अथर्व’ तर ‘इम्पेरियल’ हा 4200 स्क्वेअर फुटाचा ‘ड्यूप्लेक्स व्हीलाज्’चा प्रकल्प आहे.

एकूणच बांधकाम व्यवसाय असे क्षेत्र आहे जेथे बांधकाम व्यावसायिक दुसर्‍यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असतो. कारण चांगले घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते. आज एबीएच कन्स्ट्रक्शन ही एक नामवंत बांधकाम संस्था आहे. या संस्थेचे प्रशांत बागमार हे युवा उद्योजक ते स्वप्न पूर्ण करत आहेत. कामाबद्दलचे योगदान व अपार कष्ट करण्याची त्यांची क्षमता आजच्या युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या