Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाCSK च्या संघातून हरभजन सिंग पडणार बाहेर

CSK च्या संघातून हरभजन सिंग पडणार बाहेर

दिल्ली | Delhi

इंडियन प्रीमियर लीगचा पुढचासीजन एप्रिल-मे महिन्यात पार पडणार आहे. परंतु आज आयपीएलच्या पुढील सीजन पूर्वी सर्व खेळाडूंसाठी हा मोठा दिवस असणार आहे. याआधीच चेन्नईचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने मोठी घोषणा केली आहे.

- Advertisement -

चेन्नई टीमसोबतचा प्रवास इकडेच थांबवत आहे, असं ट्विट हरभजनने केलं आहे. हरभजन सिंगने म्हटले आहे की, चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबरचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळणे एक उत्तम अनुभव होता. चेन्नईकडून खेळताना अनेक चांगल्या आठवणी आणि मित्र मिळाले. त्यांना मी नेहमीच लक्षात ठेवेन. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ, व्यवस्थापन आणि त्यांच्या चाहत्यांचे मी आभार मानतो, असे हरभजनने सांगितले.

हरभजन सिंगने गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. वैयक्तिक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. हरभजन हा आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या