Friday, April 26, 2024
Homeनगरपतीच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

राहुरी (प्रतिनिधी) –

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला

- Advertisement -

आहे. या त्रासाला कंटाळून राहुरी तालुक्यातील गंगापूर येथील माया साळवे या विवाहित तरुणीने स्वतःला पेटवून घेतले. उपचारा दरम्यान ती मयत झाल्याची घटना दि. 1 एप्रिल रोजी घडली.

या घटनेतील मयत माया राहुल साळवे (वय 32 वर्षे) या तरुणीचे माहेर संगमनेर तालुक्यातील आहे. काही वर्षांपूर्वी तिचा विवाह राहुरी तालुक्यातील गंगापूर येथील राहुल दत्तात्रय साळवे याच्याशी झाला होता. सन 2019 ते दि. 26 मार्च 2021 या दरम्यान तिचा पती आरोपी राहुल दत्तात्रय साळवे हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमीच मारहाण करून शिवीगाळ करत असे. तसेच त्याने माया हिचा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून मयत माया राहुल साळवे हिने स्वतःचे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यात ती गंभीर भाजून जखमी झाली होती. तिच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दि. 1 एप्रिल रोजी 10.30 वाजता औषधोपचार दरम्यान ती मयत झाली.

माया हिचे वडील अंतोन खरात (वय 45 वर्षे, धंदा मजुरी रा. निमगावजाळी ता. संगमनेर) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल दत्तात्रय साळवे रा. गंगापूर ता. राहुरी. याच्या विरोधात गु. र. नं. 276/2021 भादंवि कलम 306, 323, 504, 506 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर राहुरी पोलिसांनी आरोपी राहुल साळवे याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या