Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजन‘हर हर महादेव’वरुन वाद : दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी भूमिका स्पष्ट करत विरोधकांना...

‘हर हर महादेव’वरुन वाद : दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी भूमिका स्पष्ट करत विरोधकांना सुनावलं

मुंबई | Mumbai

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ठाण्यातील एका चित्रपटगृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडला.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेवरून मनसे आक्रमक झाली असून त्यांनी या घटनेवर टीका केली आहे. घडलेल्या प्रकारावर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.

अभिजित यांच्या दाव्यानुसार, त्यांनी सारे ऐतिहासिक दस्ताऐवज यांच्यावर आधारितच सिनेमा आहे. ते संदर्भ सेन्सॉर बोर्डाकडे दिले आहेत. त्याच्या आधारेच सिनेमाला सर्टिफिकेट देण्यात आले आहे. त्यामुळे सिनेमा न पाहता त्याच्यावर टीका करणं चूकीचं असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान या शिवभक्त समजणार्‍यांनी अशाप्रकारे शिवराळ भाषा वापरत, तोडफोड करत सिनेमाचा खेळ बंद करणं, रसिकांना त्रास देणं हा प्रकार म्हणजेच त्यांच्याकडूनच शिवरायांचा एकप्रकारे अपमान आहे. त्यामुळे या अपमानाची माफी केवळ शिवरायांप्रती नव्हे तर महाराष्ट्राची देखील मागावी असं सुनावत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

आज अभिजित देशपांडे ‘हर हर महादेव’ सिनेमात जे दाखवलं आहे, त्यासाठी वापरण्यात आलेल्या संदर्भाच्या बाबतीत संध्याकाळपर्यंत सविस्तर निवेदन देणार आहेत. त्यातून या सिनेमातील ज्या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्याची उत्तरं दिली जातील. पण झालेला प्रकार लांच्छनास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठे वीर दौडले सात आणि हर हर महादेव या चित्रपटांवरून संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणं सोडलं तर अनेक ऐतिहासिक सिनेमा आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या