Happy Birtday ‘Bebo’ : करीनाच्या काही यादगार भूमिका…

jalgaon-digital
1 Min Read

बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूरचा आज वाढदिवस. करिना कपूर यांचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला. तिने साकारलेल्या काही चित्रपटातील भूमिकांमुळे ती आज बॉलीवूड मध्ये यशाच्या शिखरावर आहे. जाणून घेऊ त्या भूमिका.

2000 मध्ये युध्दावर आधारित चित्रपट ‘रिफ्युजी'(Refugee) मधून करिनाने चित्रपटामध्ये प्रवेश केला. हा चित्रपट हिट झाला.

शाहरूख खान यांच्या ‘अशोका'(Asoka) हया चित्रपटात करिनाने सशक्त भुमिका बजावली.

2001 मध्ये आलेला ‘कभी खुशी कभी गम'(Kabhi Khushi Kabhie Gham) हा चित्रपट फार यशस्वी ठरला. करीना यशाच्या शिखरावर पोहोचली होती.

2004 मध्ये करिनाने एका कॉलगर्ल ची भुमिका असलेला ‘चमेली'(Chameli) हा चित्रपट केला. या चित्रपटात तिची वेगळी भूमिका नजरेत आली.

2006 साली आलेल्या ‘ओमकारा'(Omkara) हया चित्रपटाने करिनाचा अभिनय अधिकच निखरून आला.

त्या नंतर 2007 साली आलेल्या ‘जब वी मेट'(Jab We Met) बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. “जब वी मेट” साठी बेस्ट अॅक्ट्रेस चा अवार्डही मिळाला आहे.

भारतातील 4 सर्वोत्तम चित्रपटांपैकी “3 इडियट्स्” (2011), रोमॅण्टीक ड्रामा “बाॅडीगार्ड” (2011) , सायन्स फिक्शन “रा वन” (2011) व सोशल ड्रामा “बजरंगी भाईजान” (2015) मध्ये करिनाने मुख्य भूमिका साकारली आहे.

त्यासोबतच तिचे “कूर्बान” (2009) व ड्रामा फिल्म “हिरोईन” (2012) चित्रपट तिच्या अभिनयासाठी ओळखले जातात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *