Friday, April 26, 2024
Homeजळगावक्षीक्षेत्र पिंपरखेड मारुती मंदिर येथे हनुमान जयंती उत्सव

क्षीक्षेत्र पिंपरखेड मारुती मंदिर येथे हनुमान जयंती उत्सव

डॉ.महेंद्र सांगळे

शेळावे, ता.पारोळा – parola

- Advertisement -

पारोळा ते धरणगाव (parola-dharngaon) रस्त्यावरील पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेले पिंपरखेड मारुती मंदिराची (Pimparkhed Maruti Temple) वाटचाल एका तीर्थक्षेत्राकडे होत असून अनेक भक्तांचे ते मारुती भक्तीचे तीर्थस्थान ठरले आहे. अगोदर उजाडखेड मारुती म्हणून हे लहानसे मंदिर होते.

याठिकाणी येणारे-जाणारे तुरळक भाविक येथे दर्शनास थांबत कोणी पणतीचा दिवा कोणी शेंदूर लावुन जात. पण म्हणतात ना देवाच्या मनात येते तेव्हा तो स्वतःचा जिर्णोद्धार करून घेतो. असेच याठिकाणी नियमित दर्शनास येणाऱ्या भाविकांनी या मंदिराला व परिसराला स्वतःसह लोकसहभागातून विकसित करण्याचे ठरविले.

शहरापासुन लांब, स्वच्छ सुंदर नैसर्गिक परिसर व रस्त्याला लागुन असल्याने या मंदिर व परिसराचा कायपालट होवु लागला. अगोदर मंदिराची उंची वाढवुन सुंदर कळस निर्माण करण्यात आला. हायमास्ट लॅम्प लावण्यात आले. मंदिराच्या भव्य परिसराला वॉल कंपाऊंड करण्यात येवून त्यावर कायम स्वरूपी दिव्यांची रोषणाई करण्यात आली. अनेक झाडे लावुन हा परिसर निसर्गरम्य करण्यात आला.

मंदिरा समोर बसस्थानकाची निर्मिती करून येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी परिसरात अनेक सिमेंट बाक जागोजागी ठेवण्यात आले आहेत. मंदिर परिसरातील भव्य मोकळ्या जागेत प्लेव्हर ब्लॉक लावून अतिशय स्वच्छ व सुंदर परिसराची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे श्रावण महिन्यात व इतर दिवसात नवसाचे कार्यक्रम सदैव सुरु असतात. दोन वर्षापासुन या परिसरात आता लग्नही लागत आहेत. सदैव भजन, किर्तन व सुंदर पाठाचे आयोजन सुरु असते.

पारोळा शहरातील व आजुबाजुच्या ग्रामिण विभागातुन अनेक भाविक रोज दिवसभर याठिकाणी दर्शनासाठी येतात. मारुतीरायाची मुर्ती अतिशय सुंदर असुन बोलकी आहे, दर शनिवारी याठिकाणी यात्रेचे स्वरूप असते.

उद्या शनिवार रोजी हनुमान जयंतीला हभप अक्रुर महाराज साकरे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

किर्तन व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र पिंपरखेड मारुती मंदिर मित्र मंडळ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या