Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा?

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा?

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Mumbai) यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केला. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले….

- Advertisement -

दिवसभराच्या राजकीय नाट्याच्या अंत राणा दाम्पत्याच्या अटकेने झाला होता. त्यांच्यावर पोलिसांनी (Police) कलम १२३ (अ) अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल केला. तसेच चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे, असेही गुन्हे राणा दाम्पत्यावर दाखल करण्यात आले.

“फक्त २४ तास पोलिसांना सुट्टी द्यावी, मग…”; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

त्यानंतर आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत. अॅड. रिझवान मर्चंट (Advocate Rizwan Merchant) यांनी राणांची बाजू मांडली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलांनी सांगितलं. यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

संगमनेरच्या कारागृहात साजरा झाला चक्क वाढदिवस

- Advertisment -

ताज्या बातम्या