Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनो! दहावीचे हॉल तिकीट उद्या मिळणार

विद्यार्थ्यांनो! दहावीचे हॉल तिकीट उद्या मिळणार

मुंबई | Mumbai

10 वी (SSC) आणि 12 वीच्या (HSC) परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यंदाच्या परीक्षा (Exam) ऑफलाईन (Offine) स्वरूपात होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती…

- Advertisement -

आता दहावीच्या परीक्षेची (SSC Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Students) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट (Hall Ticket) उद्या (दि. 18) दुपारी एक वाजेपासून ऑनलाईन (Online) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात येत आहे. हॉल तिकीट 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजेपासून विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.

हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शाळेच्या शिक्क्यासह विद्यार्थ्यांना वितरित करावे, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. शाळा-कॉलेजला याबाबत काही अडचणी आल्यास विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याच्या सूचना, परीक्षा मंडळाने दिलेल्या आहेत.

परीक्षा मंडळाच्या शाळांसाठी सूचना

  • ऑनलाइन प्रवेशपत्रे डाऊनलोड करून शाळांनी त्याचे प्रिंट काढून ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.

  • प्रवेशपत्रांची प्रिंट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये.

  • हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

  • प्रवेश पत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्याची दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायची आहे.

  • प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ याबाबत दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.

  • प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या