Saturday, April 27, 2024
Homeनाशिकखुशखबर! नऊ महिन्यानंतर पहिल्यांदाच गजबजणार नाशिकमधील मैदानं

खुशखबर! नऊ महिन्यानंतर पहिल्यांदाच गजबजणार नाशिकमधील मैदानं

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या नऊ महिन्यांपासून करोना महामारीमुळे सर्वच खेळ, स्पर्धांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत असून आता राज्य सरकारकडून स्पर्धा खेळवण्यासाठी परवानगीदेखील दिली आहे. त्यामुळे नाशिकमधील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या स्पर्धा आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून खेळवण्यात येणार आहेत…

- Advertisement -

याबाबतची माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिन समीर रकटे यांनी दिली. ते म्हणाले, करोनाचा काळ हा प्रत्येक खेळाडूसाठी, प्रशिक्षकांसाठी आणि संघटनेसाठी खडतर असाच होता.

नुकतीच महाराष्ट्र शासनाने स्पर्धा घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हकीम मर्चंट ट्रॉफी ची सुरुवात करण्याचे निश्चित केलेले आहे.

ही वार्ता सर्वच खेळाडूंसाठी आनंदाची गोष्ट आहे. स्पर्धा खेळत असतांना आपल्याला शासकीय नियमावलीचे काटेकोर पालन करावयाचे त्यांनी सांगितले आहे.

इथे खेळवले जातील सामने

नाशिक शहरातील गोल्फ क्लब ग्राउंड, महात्मा नगर येथील ग्राउंड व सैयद पिंपरी येथील ग्राउंडवर या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.

अशी घेतली जाणार काळजी

वेळोवेळी परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येईल

ठिकठिकाणी सनिटायजर

खेळाडूंसह सर्वांनाच मास्क वापरणे बंधनकारक असेल

सामाजिक अंतर पाळण्यासाठी वेळोवेळी जनजागृती

प्रसाधन गृहांची वेळोवेळी स्वच्छता

- Advertisment -

ताज्या बातम्या