Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : बळीराजाला कोणी वाली आहे का? महिनाभरात ९ वेळा गारपीट, अवकाळीचे...

Video : बळीराजाला कोणी वाली आहे का? महिनाभरात ९ वेळा गारपीट, अवकाळीचे थैमान; शेतकऱ्याची कांद्याला तिलांजली

डांगसौंदाणे | निलेश गौतम | Dangsaundane

गत 50 वर्षांच्या कालावधीत जे झाले नाही ते एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळीमुळे झाले आहे. अवकाळी बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. गारपिटीने साधारणतः 25 हजार हेक्टर क्षेत्रावरील सुमारे एक कोटी मेट्रिक टन कांद्याचे नुकसान झाले आहे…

- Advertisement -

10 एप्रिलला झालेल्या गारपिटीने उध्वस्त झालेला बळीराजा संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळीचा सामना करताना दिसून येत आहे. हजारो हेक्टरवरील कांदा जमिनीतच सडला आहे तर अनेकांनी एकरी 85 ते 90 हजार खर्च करून जमिनीतून वर काढलेला कांदा जागेवरच सडत असल्याने या कांद्याला जमिनीतीच गाडण्याची तयारी सुरू केली आहे.

अनेकांनी उभ्या कांद्याला रोट्याव्हेटर मारले आहे. तर अनेक जण ट्रॅक्टरच्या सहाय्याने या कांद्याला उकीरड्यावर फेकत आहेत. अनेकांचे कांदे जमिनीतून वर काढण्याचे काम सूरु असताना रोजच दुपारच्या सत्राला येणारा अवकाळी कांद्याला मातीमोल करत आहे.

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! तीक्ष्ण हत्याराने युवकाचा खून

बळीराजाला शासनाकडून अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. आज डांगसौंदाणे येथील एका स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यावरच अंतिम संस्कार करून आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली. 4 महिने रात्रंदिवस मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला अशा प्रकारे तिलांजली देण्याची नामुष्की बळीराजावर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी

एकरी 85 ते 90 हजार खर्च करून हाती 85 पैसे मिळण्याची शास्वती नसल्याने कोपलेल्या निसर्गापुढे बळीराजा संपला असच म्हणावे लागेल.

 कांदा पिकाला एकरी येणारा खर्चाचा तपशील

1) रोप बियाणे तयार करणे -10 हजार

2) शेत तयार करणे – 12 हजार

3) शेणखत – 10 हजार

4) लागवड -15 हजार

5) दोन वेळा फवारणी – 10 हजार

6) कृत्रिम खते – 12 हजार

7) निंदणी – 4 हजार

8) काढणी – 12 हजार

Nashik Accident : पिकअपची झाडाला जोरदार धडक; तीन ठार, १३ जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या