Friday, April 26, 2024
Homeनगरगारपीटने नुकसान झालेल्या पिकांची अधिकार्‍यांकडून पाहणी

गारपीटने नुकसान झालेल्या पिकांची अधिकार्‍यांकडून पाहणी

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील खांबे गावासह पुर्व व पठार भागाकडील असणार्‍या बहुतांश गावामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या

- Advertisement -

गारपिठासह पावसांने झोडपल्याने दुष्काळात तेरावा महीना म्हणी नूसार अर्ध्या – पाऊन तासात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने 24 तासाच्या आत शासनाच्या वतीने प्रांताधिकारी, तहसिलदारांनी तातडीने पचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले.

मार्च महिना म्हणजे गहू-हरभरा सोंगणीचे दिवस पावसाचा अंदाज नसतानाही पावसाने गारपिठीसह हजरी लावल्याने खांबे, शेंडेवाडी, म्हैसगाव मधील शेतीमाला सह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी साडे पाचच्या दरम्यान पिंपळगाव देपा, मांडवे, चिखलठाण, वरवंडी, आदिसह पठार व पुर्व भागात पावसाने हजरी लावून शेतकर्‍यांची धांदल उडून दिली. काही ठिकाणी कमी प्रमाणात गारपिठ झाली.

मात्र खांबे, शेंडेवाडी, म्हैसगाव मध्ये कहरचं झाला. करोना संकटातून बाहेर पडत असताना शेतकर्‍यांनी मोठ्या मुश्कीलने आप-आपल्या परीने पिके उभी केली मात्र अर्ध्या ते पाऊन तासात झालेल्या गारपीठासह कांदा, गव्हू, हरभरा, मका, ऊस, डाळींब, टोमॅटो आदि पिकांचे मोठे नूकसान झाल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रूचं तरळल्याने शेती मालाच्या झालेल्या नुकसानाचे त्वरीत पंचनामे व्हावे म्हणून मागणी झाल्याने अवघ्या 15 ते 16 तासातचं शासनाकडून प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी आधिकारी प्रशांत शेंडे यांच्या उपस्थितीत सर्व नुकसान भागाची पहाणी करत पंचनामे करण्यात आले.

खांबे, शेंडेवाडी, म्हैसगाव आदिसह परिसरात झालेल्या गारपिठासह पावसामुळे शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाल्याने शासनाच्या वतीने रविवारी सकाळीच शासनाचा ताफा हजर होत पंचनामे करुन शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी खांबेचे संरपच रविंद्र दातीर, पंचायत समिती विस्तार आधिकारी किरण अरगडे, तलाठी कुंदेकर, कृषी सहाय्यक सौ. अर्पणा गडाख, ग्रामसेवक व्ही. एस. सानप आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या