Saturday, April 27, 2024
Homeजळगावहागणदारीमुक्त चैतन्य तांडा गावाची जि.प.सीईओंनी केली पाहणी

हागणदारीमुक्त चैतन्य तांडा गावाची जि.प.सीईओंनी केली पाहणी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील चैतन्य तांडा Chaitanya Tanda ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त Hagandari-free झाल्याने चाळीसगाव Chalisgaon दौर्‍यावर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया Zilla Parishad Chief Executive Officer Dr. Pankaj Asia यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी Survey केली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे गुरूवार रोजी चाळीसगाव दौर्‍यावर होते. दरम्यान तालुक्यातून एकमेव चैतन्य तांडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याने डॉ.पंकज आशिया यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी केली. त्याचबरोबर तांड्यात राबविल्या गेलेल्या विविध योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. लोक लोकसहभागातून झालेल्या विकास कामाबाबत डॉ. पंकज आशिया यांनी प्रशंसा केली. उपसरपंच आनंदा राठोड यांनी डॉ. पंकज आशिया यांना फूल देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत केले. दरम्यान मुख्खाधिकार्‍यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे आचर्य व्यक्त होत आहे. यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे सचिव संजीव कुमार निकम, तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष येवले भाऊसाहेब, विलास आबा, विस्ताराधिकारी कैलास माळी, विस्तार अधिकारी आर. आय. पाटील, माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, मंगेश राठोड, संतोष पवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या