Friday, April 26, 2024
HomeजळगावH3N2 नागरिकांनो काळजी घ्या !

H3N2 नागरिकांनो काळजी घ्या !

सुषलर भालेराव । जळगाव jalgaon

राज्यात एका नव्या संक्रमणाची चाहुल लागलेली आहे. इन्फ्लूएंझा ए विषाणूचा (influenza A virus) उपप्रकार एच3एन2 (H3N2) पॉझिटीव्ह सदृष्य रुग्णांचे (Positive analogy) संक्रमण वाढत (Patient transmission) चालले आहे. अद्याप जिल्ह्यात एच3एन2 संक्रमणाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत.परंतु, हवामानातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे.

- Advertisement -

ठरावीक काळापर्यंतच्या राहणार्‍या लक्षणांनी काही प्रमाणात नागरिक ग्रासले आहेत. इन्फेक्शनच्या प्रभावामुळे ठराविक काळापर्यंत खोकला, ताप, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, शरीरात वेदना होणे, अतिसाराचा त्रास अशी लक्षणे जाणवतात. अशावेळी कोणती उपायात्मक खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य विभागातील तज्ज्ञ अभ्यासक काय सांगतात ते ऐकणे प्रभावी ठरते.

विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी लक्षणे सदृष्य व्यक्तींचा संपर्क टाळल्यास विषाणुचा प्रसार रोखण्यास मदत होवू शकते. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, गेल्यास मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. लक्षणे आढळलीच तर, ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

कोणतेही लक्षणे, त्रास जाणवल्यास घाबरुन न जाता योग्य ती खबदारी घेतल्यास आपल्यासह इतरांच्या आरोग्याचे रक्षण सहज होवू शकते.

काय काळजी घ्याल

शिंकतांना किंवा खोकतांना नाक आणि तोंड झाका

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, बाहेर जातांना मास्क वापरा

हायड्रेड राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, निरोगी जीवनशैली राखल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढीस मिळते चालना

जिल्ह्यात सध्या एच3एन2चा धोका नाही. मात्र, व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता आणि सावधानता बाळगणे गरजेचे आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात सर्व्हेक्षण आणि जनजागृती करण्याचे काम सुरु आहे.

डॉ. देवराम लांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

अशी लक्षणे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींना किंवा सहवासातील व्यक्तींना आढळून आल्यास तात्काळ फॅमिली डॉक्टर, नजीकच्या शासकीय रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडे तपासणी करुन घ्यावी असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या