Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारकाल्लेखेतपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ग्लोबल भरारी

काल्लेखेतपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ग्लोबल भरारी

मोदलपाडा ता. तळोदा – Modalpada – वार्ताहर :

काल्लेखेतपाडा गुगल मॅपवर शोधायला गेलो तर आजही सापडणार नाही. सातपुड्याच्या अतिदुर्गम धडगांव तालुक्यात आजही दुर्गमता, अज्ञान, अंधश्रद्धा, आरोग्य, शिक्षण अशा समस्यांनी ग्रासलेल्या आहे.

- Advertisement -

या तालुक्याच्या उमराणी बु.या गावाचा पाडा असलेल्या काल्लेखेतपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जगभरातील दर्जेदार शिक्षणाकरिता अग्रगण्य असलेल्या जगातील 100 प्रतिष्ठित शाळांच्या ग्लोबल शोकेससाठी निवड झाली आहे.त्यामुळे नंदूरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून ग्लोबल भरारी घेतली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ही शाळा सहा खंडातील हजारो शाळांमधून निवडली गेली आहे आणि ऑक्टोबर 2020 च्या सुरुवातीस ऑनलाईन होणार्‍या उद्घाटन जागतिक शैक्षणिक आठवड्यात महाराष्ट्रातील सरकारी शाळांपैकी एक आहे.आयोजकांच्या मताने हे जगातील सर्वात मोठी शिक्षण परिषद म्हणून याची दाखले देत आहेत.

जि.प.शाळा काल्लेखेतपाडा ता. धडगांव ही शाळा महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या ग्यानप्रकाश फाऊंडेशन सह एक तासाच्या व्हर्च्युअल कार्यक्रमाचे भाग असणार आहे.

काल्लेखेतपाडा या शाळेवरील लाईव्ह व्हर्चुअल म्हणजेच ऑनलाईन इव्हेंट येत्या दि.8 ऑक्टोबर दुपारी 1 ते दुपारी 2 वाजेदरम्यान जागतिक स्तरावर प्रसारित होईल.

काल्लेखेतपाडा ही जि.प.शाळा फक्त 14 मुलांसोबत सुरू झालेल्या या वस्ती शाळेचा प्रवास आज एक 140 मुलांच्या सोबत घेऊन जागतिक ग्लोबल भरारी घेण्याच्या दिशेने जाणारा प्रवास दाखवणारी थक्क करून प्रेरणा देणारी आहे.

हे नेमके कसं घडलं आणि त्यामागे असलेल्या मेहनतीचे सादरीकरण या लाईव्ह व्हर्चुअल इव्हेंट मध्ये देण्यात येणार आहे.

उद्याचे भविष्य इथे किलबिलते हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ही शाळा चालविली जाते सन 2001 मध्ये श्री तेगा पावरा यांच्या वस्ती शाळेचे 2009 मध्ये आलेले शिक्षक रुपेशकुमार नागलगावे यांनी शाळेत मुलांची पटनोंदनी करून पालक आणि समाजाला यात सामील करत यशाचे बीजारोपण केला आहे.

शिक्षणातील लोकसहभाग, पालक संपर्क व समाजाशी असलेल्या शिक्षकांच्या सुसंवाद या विषयावरील या परिसंवादात शाळेची निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हे काल्लेखेतपाडा शाळेविषयी या जागतिक लाईव्ह इव्हेंट मध्ये बोलणार आहेत.

ही निश्चितच एका दुर्गम आदिवासी भागातील शाळेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. तसेच या शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार नागलगावे, सहशिक्षक लक्ष्मीपुत्र उप्पीन, पालक प्रतिनिधी म्हणून तेगा पिदा पावरा, चेतन पावरा तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मोगी रमेश पावरा,मनीषा अंधार्‍या पावरा हे आपले सादरीकरण करणार आहेत.तर मॉडरेटर म्हणून ग्यान प्रकाश फाऊंडेशनच्या शिक्षिका पल्लवी मुखेडकर बोलणार आहेत.

विविध समस्यांवर मात करत सुरू असलेल्या या शाळेला आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी बारीपाडा उमराणी ब.ु येथील 29 मुलांची पायपीट आज ही संपलेली नाही.

या शाळेच्या संपूर्ण प्रवासात प्राथमिक शिक्षण विभाग, डाएट नंदूरबार, धडगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, धडगाव डी.डी.राजपूत, शिलवंत वाकोडे, योगेश सावळे, केंद्रप्रमुख बी.डी.पाडवी, प.स.सदस्या शोभाबाई फत्तेसिंग पावरा, सरपंच आशाबाई वंतीलाल पावरा व सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेरसिंग पावरा व सर्व सदस्य, तसेच ग्यान प्रकाश फाऊंडेशन चे अशोक पिंगळे, मधुकर माने, सागर धनेदर , ग्रामस्थ, यांचे अनमोल सहकार्य मिळाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या