Sunday, April 28, 2024
Homeनगरगुटख्याची वाहतूक करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

गुटख्याची वाहतूक करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गुटखा बंदी (Gutkha Ban) असतानाही बेकायदेशिररित्या गुटखा (Gutkha illegally) व तंबाखू जन्य पदार्थांची (Tobacco products) वाहतूक करणार्‍या वाहनाने एका मोटारसायकलला धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर वाहनचालक फरार झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात (Police Station) एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

वडगावपान (Vadgav Pan) ते तळेगाव (Talegav Road) जाणार्‍या रोडवर वडगावपान (Vadgav Pan) फाट्यावर एका वाहनामधून बेकायदेशिररित्या गुटखा (Gutkha illegally) व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक (Transport of Tobacco Products) होत होती. दरम्यान या वाहनाने एका मोटारसायकलला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. अपघाताची माहिती सरपंचांनी तालुका पोलिसांना दिली. माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले.

1 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार क्रमांक एम. एच. 02 जे. पी 4913 मध्ये पांढर्‍या रंगाच्या 13 गोण्यामध्ये गुटखा 1 लाख 65 हजार 360 रुपये किमतीचा तसेच एका गोणीमध्ये हिरा पानमसाला गुटखा 8040 रुपये किमतीचा, हिरवट रंगाच्या 7 गोण्यांमध्ये रॉयल 717 तंबाखूचे पिवळ्या रंगाचे एकूण 1484 पाऊच 44 हजार 520 रुपये किमतीचा असा एकूण 3 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलीस नाईक नितीन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अफरोज उर्फ आफ्रीदी रफिक पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 461/2021 भारतीय दंड संहिता 328, 188, 272, 273, सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2), (र्ळीं) चे अल्लंघन कलम 59 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. के. दातीर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या