Wednesday, April 24, 2024
Homeनगरगुटखा व शस्त्र प्रकरणातील दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

गुटखा व शस्त्र प्रकरणातील दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

साकुरी |शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

गुटखा व शस्त्र प्रकरणी शिडि पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना राहता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी दिली.

- Advertisement -

शहरात परराज्यातून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात 50 हजाराची दुचाकी व दहा हजारांचा देशी बनावटीचा कट्टा पाचशे रुपये किमतीचे जीवत काडतुस, 72 हजारांचा गुटखा पानमसाला 38 हजारांची तंबाखू असा जवळपास दोन लाख 39 हजार पाचशे 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. शिर्डी पोलिसांची ही मोठी कारवाई होती. कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली होती.

यात एकजण फरार आहे. शिर्डी पोलिसांनी आयुष सुनिल केशेसीया (वय 19 रा. इंदौर, मध्यप्रदेश), आशिष अशोकलाल खाबिया (वय 28, रा. शिर्डी) या दोघांना अटक करण्यात आली असून अभय गुप्ता (रा. इंदौर मध्यप्रदेश) हा फरार आहे. यातील दोघांना राहता न्यायालयात हजर केले असता राहता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी दिली.

जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिर्डी परीसरात खळबळ उडाली आहे. यापुढील काळात देखील अवैध व्यवसाय रोखण्याची शिर्डी पोलिसांकडून कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून यात फरार असलेल्या अभय गुप्ता यांचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे. गावठी कट्टा कोठुन आणला, कोणी दिला, यात आणखी कोणी सहभागी आहे का, यात जप्त करण्यात आलेला गुटखा कोणाकडून खरेदी करण्यात आला, यात आणखी कोणी सहभागी आहे का, यांना कोणाचे पाठबळ आहे का, हे एकमेकांच्या सहवासात किती दिवसांपासून आहे, या गावठी कट्याचा कोठे वापर करण्यात आला आहे का, तो जवळ ठेवण्याचे कारण काय, तसेच एकमेकांशी झालेला मोबाईल संवाद आदीसह विविध बाबी या तपासात पुढे येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या