Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळ्यात रिक्षासह दोन लाखांचा गुटखा जप्त

धुळ्यात रिक्षासह दोन लाखांचा गुटखा जप्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील कनोसा हायस्कूल समोर आझादनगर पोलिसांनी आज सकाळी रिक्षासह 2 लाख 4 हजारांचा गुटाखा जप्त केला.

- Advertisement -

रिक्षा चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

आझादनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर हे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पथकासह चाळीसगाव रोडवर पेट्रोलींग करीत होते.

त्यादरम्यान त्यांना कनोसा हायस्कूलसमोर रिक्षातून (क्र. एम.एच 15 वाय 2065) गोण्यांमध्ये काहीतरी घेवून जातांना दिसला.

त्यामुळे रिक्षा चालकाला थांबण्यास सांगितले असता तो रिक्षा सोडून पळून गेला. तपासणी केली असात रिक्षात गुटाखा आढळून आला.

30 हजार रूपये किंमतीची रिक्षा, 1 लाख 55 हजार 584 रुपये किंमतीची विमल पान मसाल्याची पाकीटे, 19 हजार 360 रुपये किंमतीची व्ही 1 तंबाखुची पाकीटे असा एकूण- 2 लाख 4 हजार 944 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक श्री. बच्छाव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिनेश आहेर, पोना डी.एस. कोळी, पोकॉ शाम हटकर चालक खैरनार, रविंद्र साळूंखे, पोकॉ पी.यु. पवार यांनी केली आहे. रिक्षा चालकाचा शोध घेवून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या