Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळ्यात सव्वातीन लाखांचा गुटखा जप्त

धुळ्यात सव्वातीन लाखांचा गुटखा जप्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील लोकमान्य हॉस्पीटलच्या मागील बाजूस असलेल्या एका घरावर स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने छापा टाकून

- Advertisement -

तीन लाख 36 हजार 442 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी एका विरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला चाळीसगाव रोड परिसरातील लोकमान्य हॉस्पीटलच्या मागील बोळीत एजाज तांबोळी याच्या घराच्या पाठीमागे गुटखा उतरवून लपवून ठेवला जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने एजाज अनिस तांबोळी रा. विजय कॉलनी, प्लॉट नं. 11 लोकमान्य हॉस्पीटलच्या मागे, अमन किराणा शेजारी असलेल्या घराची व वॉलकंपाऊंडची झडती घेतली असता घराच्या मागील बाजूस कोपर्‍यात एका ताडपत्रीखाली काहीतरी झालेले दिसून आले.

त्याची तपासणी केली असता त्यात खाकी व पांढर्‍या रंगाच्या गोण्या दिसून आल्या. गोण्यात काय आहे असे विचारले असता संबंधिताने उडावा उडवीची उत्तरे दिली. त्या गोण्यांमध्ये विमल पानमसाला, सुगंधी तंबाखू असा माल आढळून आला.

त्या ठिकाणाहून तीन लाख 36 हजार 424 रुपये किंमतीचे विमल पानमसाला व सुगंधी व्ही-1 टोबॅको असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत एजाज तांबोळी विरुध्द अन्न सुरक्षा मानके कायदा अन्वेय चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उमेश बोरसे, पोहेकॉ सुनिल विंचूरकर, संदीप थोरात, मनोज पाटील, चेतन कंखरे, पोकॉ रवीकिरण राठोड यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या