Saturday, April 27, 2024
Homeनगरगुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे हजारो भाविकांची उपस्थिती

गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे हजारो भाविकांची उपस्थिती

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे 13 जुलै रोजी हजारो भाविकांच्या उपस्थित गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेऊन आपला भक्तिभाव वृद्धिंगत केला.

- Advertisement -

पहाटेच्या सुमारास भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह सद्गुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीसह समाधीस अभिषेक घालण्यात आला. दुपारच्या सत्रात भगवान दत्तात्रयांची आरती करण्यात आली. भजनी मंडळाच्यावतीने भजने गाण्यात आली. देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते

कीर्तनप्रसंगी प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले, गुरूंचे व त्याचप्रमाणे महाभारतासारखे महान खंडकाव्य रचणार्‍या ऋषी व्यासांचे पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस आहे. गुरूंचा आशीर्वाद मिळवणे, कृपादृष्टी संपादन करणे, मनात गुरूंचे स्मरण ठेवणे व त्याचबरोबर गुरूंचा वारसा पुढे चालवणे हे गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील प्रमुख उद्देश आहेत. जीवन गुरू विना व्यर्थ आहे, गुरूमुळे जीवन आनंदमय होते असे सांगितले.

दिवसभर भाविकांनी श्री भगवान दत्तात्रय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांसह पंचमुखी सिद्धेश्वर, कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. तसेच भास्करगिरी महाराज यांचे संतपूजन केले.

भास्करगिरी महाराज बोलताना म्हणाले, ज्ञानाचा प्रकाश देऊन मनुष्य जीवनातील अंध:कार दूर करण्याचे काम गुरू करतात. गुरूंमुळे ज्ञानाची प्राप्ती होते. जीवनाला उजाळा गुरू कृपेने मिळतो. देशात सर्व जाती धर्मात एकोपा राहावा. कीर्तन भजनाने ऐकल्यानंतर आध्यात्मिक ऊर्जा मिळते, दिशादर्शक म्हणून गुरू काम करतात. जीवनाला सुंदर व फलद्रुप करण्यासाठी गुरूंच्या विचारांवर निष्ठा ठेऊन भक्ती करा, असे आवाहन केले.

याप्रसंगी नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज, बाबासाहेब महाराज, बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठल लघे, उदयन गडाख उपस्थित होते. गंगापूर येथील सोमाणी परिवाराच्यावतीने अन्नदान करण्यात आले.

पहाटेपासून भाविकांची गर्दी होती. दिवसभर भर पावसातही गर्दीचा ओघ सुरू होता. दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या