Thursday, April 25, 2024
Homeनगरगुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी साळवे

गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी साळवे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी गुरुमाऊली शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शिक्षक

- Advertisement -

संघाचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजकुमार उर्फ राजू साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्याकडे दोन पदे असल्याने एक पद सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिक्षक संघ आणि गुरुमाऊली मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशन करोनामुळे लांबणीवर पडल्याने आणि शिक्षक संघाचे भव्य त्रैवार्षिक अधिवेशन घेऊनच लोकशाही पद्धतीने निवड करण्याचा आदेश राज्य संघाने दिल्याने जिल्हा गुरुमाउली मंडळाच्या निवडीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली.

तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन मीटिंग मधील चर्चेनंतर राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांनी ही निवड जाहीर केली. राजू साळवे यांच्या निवडीने जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या एका चांगल्या कार्यकर्त्याला उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या